Nita Ambani यांच्या ५० व्या वाढदिवसाचा थाट, खर्चाचा आकाडा ऐकून विस्फारतील डोळे, ३२ चार्टर्ड विमान आणि बरंच काही

लाइट इफेक्टसाठी सिंगापूर येथून खास टीम तर, सजावटीसाठी थायलंडहून महागडी फुलं... नीता अंबानी यांच्या वाढदिवसासाठी कोट्यवधींचा खर्च... अंबानी कुटुंबाचा थाटच वेगळा...

Nita Ambani यांच्या ५० व्या वाढदिवसाचा थाट, खर्चाचा आकाडा ऐकून विस्फारतील डोळे,  ३२ चार्टर्ड विमान आणि बरंच काही
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 5:06 PM

मुंबई : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. कोणताही कार्यक्रम असला, तर अंबानी कुटुंब एकत्र येवून त्या कार्यक्रमाचा आनंद लूटतात. लग्न कार्यक्रमापासून ते वाढदिवसापर्यंत अंबानी कुटुंबातील अनेक कार्यक्रम मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरे होतात. २०१३ साली नीता अंबानी यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या रॉयल पद्धतीत नीता यांचा वाढदिवस साजरा झाला.

१ नोव्हेंबर २०१३ मध्ये राजस्थान येथील उम्मेद भवन येथे नीता अंबानी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नीता अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल २५० पाहुणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उम्मेद भवन याठिकाणी पोहोचले. या सर्व पाहुण्यांना रिलायन्स ग्रुपच्या 32 चार्टर्ड विमानांद्वारे भव्य रिसॉर्टमध्ये आणण्यात आलं, ज्यांच्या फक्त वाहतुकीचा खर्च कोट्यवधी रुपयांमध्ये होता.

नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा खर्च ३० मिलियन अनेरिकन डॉलर म्हणजे, जवळपास २२० कोटी रुपये इतका झाला होता. यामध्ये सर्वात जास्त खर्च डेस्टिनेशन, वाहतुकीवर झाला होता. नीता अंबानींच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीची सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या पूजेने झाली. यासोबतच धीरूभाई अंबानींचा चेहरा आकाशात साकारण्यासाठी लाइट शोचं देखील आयोजन करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

धीरूभाई अंबानी लाइट इफेक्टसाठी सिंगापूर येथून खास टीम बोलावण्यात आली होती. शिवाय कार्यक्रमात थायलंड येथून फुलं मागवण्यात आली होती. या पार्टीमध्ये मुलांसाठी देखील खास व्यवस्था करण्यात आली होती. मुलांना खेळण्यासाठी लंडन येथून राइड्स मागवण्यात आल्या होत्या.

नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मित्तल, महिंद्रा, बिर्ला, गोदरेज, शाहरुख खान, आमिर खान, करिश्मा कपूर आणि रानी मुखर्जी यांसारख्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यांच्याशिवाय, मुंबई इंडियन्स आयपीएल टीमला देखील नीता अंबानी यांनी निमंत्रित केलं होतं. या पार्टीमध्ये प्रियंका चोप्रा (Priyanka Chora) आणि एआर रहमान (AR Rehman) यांनी देखील सादरीकरण केलं होतं.

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.