Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai | ‘उद्धव ठाकरेंची नजर एनडी स्टुडिओवर’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Nitin Desai | नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ वादाच्या भोवऱ्यात, उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याचा गंभीर आरोप... नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ

Nitin Desai | 'उद्धव ठाकरेंची नजर एनडी स्टुडिओवर', भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 11:25 AM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या पोलीस नितीन देसाई मृत्यू प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. काही वर्षांपूर्वी नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. म्हणून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजप अमदार नितेश राणे यांनी नितीन देसाई मृत्यू प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नितीन देसाई यांच्या निधनासंदर्भात असलेली माहिती आम्ही देवू असं वक्तव्य भाजप अमदार नितेश राणे यांनी केलं आहे. एवढंच नाही तर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चर्चा रंगत आहेत.

नितेश राणे म्हणाले, ‘चौकशी झाल्यानंतर आमच्याकडे जी माहिती आहे ती समोर आणू. इंडस्ट्रीमधील बहुतेक लोकांना माहिती आहे, की कशा प्रकारे जोर-जबरदस्ती केली जायची. प्रविण दरेकर यांनी सांगितलं, जेव्हा नितीन देसाई उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. पण ते भटले नाहीत..’

‘उद्धव ठाकरे यांची नजर एनडी स्टुडिओवर होती. मराठी माणसाला उभं करायचं नाही. स्वतःचे पैसे नंदकुमार चतुर्वेदीकडे ठेवायचे. एक मराठी माणूस मोठा झाला आहे. त्याचा देखील स्टुडिओ बळकावायचा प्रयत्न.. याचा २४ तास क्रर्यक्रम असयाचा…’ असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नितीन देसाई मृत्यूप्रकरणी भाजपवर निशाणा साधला.. ‘सनी दोओल यांना वाचवलं मात्र नितीन देसाई यांना वाचवण्यात आलं नाही, त्यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं…’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप सरकरावर निशाणा साधला आहे.

सिनेविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये शेवटचा श्वास घेतला. सध्या पोलीस त्यांच्या निधनाची चौकशी करत आहेत. दरम्यान, नितीन देसाई मृत्यू प्रकरणामधील आरोपी रशेस शाहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच आरोपी घरात आणि कार्यालयातही नसल्याचं समोर आलं आहे.

'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान
दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम.
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ
राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यू, दमानियांच्या टि्वटने खळबळ.
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.