Nitin Desai | “दादा, एका शब्दाने बोलला असता तर..”; नितीन देसाई यांचे असोसिएट भावूक

भावूक झालेले प्रदीप गोगटे यांनी पुढे सांगितलं की "नितीन देसाई यांनी अनेकांच्या कठीण काळात मदत केली होती. त्यांच्या स्टुडिओच्या जवळपास राहणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्यामुळे नोकरी मिळाली होती."

Nitin Desai | दादा, एका शब्दाने बोलला असता तर..; नितीन देसाई यांचे असोसिएट भावूक
Nitin Desai Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 9:24 AM

अलिबाग | 5 ऑगस्ट 2023 : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भव्यदिव्य एनडी स्टुडिओ बनवल्यानंतरही त्यांनी या स्टुडिओच्या अवतीभवती राहणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी दिली होती. गेल्या चार वर्षांपासून देसाईंसोबत सहाय्यक म्हणून काम करणारे प्रदीप गोगटे यांनी ‘टीव्ही 9’सोबत बोलताना शोक व्यक्त केला. “दादांच्या (नितीन देसाई) निधनाने मला खूप मोठा धक्का बसला आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की त्यांच्यासारखा इतका सकारात्मक आणि उत्साहाने भरलेला व्यक्ती असं पाऊल उचलू शकतो”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

भावूक झालेले प्रदीप गोगटे यांनी पुढे सांगितलं की “नितीन देसाई यांनी अनेकांच्या कठीण काळात मदत केली होती. त्यांच्या स्टुडिओच्या जवळपास राहणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्यामुळे नोकरी मिळाली होती. त्यांच्या स्टुडिओमध्ये होणाऱ्या अनेक फेस्टिव्हल्स आणि शोजदरम्यान ते गरजू लोकांना आणि महिलांना मोफक त्यांचे स्टॉल लावण्याची परवानगी द्यायचे. प्रत्येकाने प्रगती करावी, असा त्यांचा त्यामागचा हेतू होता.”

“त्यांना सतत चिंता असायची, पण त्यांनी कधीच त्यांच्या समस्या इतरांना सांगितल्या नाहीत. दादा तुम्ही एका शब्दाने आम्हाला सांगितलं असतं तर सर्वकाही ठीक झालं असतं. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत होतो. तुम्हाला असं पाऊल कधीच उचलू दिलं नसतं. त्यांच्या जाण्याने एनडी स्टुडिओसुद्धा आता आमच्यासाठी परकं झालं आहे”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जुन्या आठवणींना उजाळा देत प्रदीप म्हणाले, “जेव्हा नितीन दादा स्टुडिओत होते, तेव्हा आम्ही कधीही इथे यायचो. त्यांनी त्यांच्या टीमला सांगितलं होतं की प्रदीप कधीही माझ्या ऑफिसमध्ये येऊ शकतो. मात्र जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा मी आणि नितीनजी यांचे मित्र भूषण तेलंग स्टुडिओच्या गेटवर पोहोचलो, तेव्हा आम्हाला आत जाण्याची परवानगी नाकारली. त्यांच्या जाण्यानंतर स्टुडिओचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद झाले.”

नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपच्या पाच पदाधिकाऱ्यांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन देसाई यांनी 2 ऑगस्टला चौक इथल्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. शुक्रवारी नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ईसीएल फायनान्स कंपनी एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांनी कर्जप्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून नितीन देसाई यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असा आऱोप त्यांनी या तक्रारीत केला आहे.

भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.