Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai | ‘ही लोकं मला त्रास…’, नितीन देसाई यांच्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

'ही लोकं मला त्रास...', नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतला मोबाईल, ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांचा उल्लेख.. धक्कादायक माहिती समोर

Nitin Desai | 'ही लोकं मला त्रास...', नितीन देसाई यांच्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 2:37 PM

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : दिग्गज कालदिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे. पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. पण आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं. आता त्याच्या निधनानंतर मोठी माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आता पोलिसांनी नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मोबाईलमधील ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांचं नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांना ताब्यत घेतला आहे. ज्या ऑडिओ क्लिपची आता चर्चा रंगत आहे, त्या ऑडीओ क्लिपची पडताळणी फॉरेन्सिक टीम करत आहे. नितीन देसाई यांनी काही लोकांची नावे या ऑडीओ क्लिपमध्ये रेकॉर्ड केल्याची माहिती देखील समोर येत आहे. पण ती नावं कोणची आहेत हे अद्याप समोर आलेलं नाही. ऑडीओ क्लिपची पडताळणी सर्वप्रथम पोलिसांकडून केली जाईल. शिवाय नितीन देसाई यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या ऑडिओ क्लिप त्यांच्याच आवाजातील आहेत का? याची खातर रायगड पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

नितीन देसाई यांचा मृतदेह अद्याप एनडी स्टुडीओमध्ये आहे. पण सायबर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रायगडचे पोलीस सोमनाथ घारगे घटनास्थळी आहेत. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी आहेत. ऑडिओमध्ये ही लोकं मला त्रास देत आहेत. म्हणून त्यांनी आत्महत्या केली.. ऑडिओ क्लिप तपासात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.. सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

१८० कोटी रुपयांचा कर्ज घेताना नितीन देसाई यांनी ४२ एकर जमीन तारण ठेवल्याची माहिती देखील समोर येत आहे. कर्ज घेताना नितीने देसाई ज्या जमिनी तारण ठेवल्या होत्या, त्यांची मालमत्ता जप्त करून आमची कर्जवसुली करुन द्या आसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. ती कारवाई नितीन देसाई यांच्यावर प्रलंबित आहे. त्यामुळे नितीन देसाई मानसिक त्रासात असावे अशी चर्चा समोर येत आहे.

१८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आता नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं आहे आणि या मागे आर्थिक विवंचनेचं कारण आहे का? त्यांना कोण त्रास देत होतं.. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या निधनानंतर खळबळ माजली आहे.

नितीन देसाई यांचे निकटवर्तीय देखील याबद्दल बोलताना दिसत आहेत. ते मानसिक त्रासामध्ये होते शिवाय अनेक अनेक अडचणींचा नितीन देसाई सामना करत होते.. अशी माहिती समोर येत आहे. घटनास्थळी नितीन देसाई यांचे कुटुंबिय देखील दाखल झाले.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.