नितीन देसाईंच्या ND स्टुडिओत भीषण आग, ‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक येथून कर्जत कडे जाणाऱ्या मार्गावर नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे (ND Studio Jodha Akbar Set Fire)

नितीन देसाईंच्या ND स्टुडिओत भीषण आग, 'जोधा अकबर'च्या किल्ल्याचा सेट भक्ष्यस्थानी
जोधा अकबर सिनेमाच्या सेटवर आग
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 2:27 PM

रायगड : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमधील सेटला आग लागली. ND स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी बनवण्यात आलेला किल्ल्याचा सेट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. (Nitin Desai ND Studio Raigad Khalapur Jodha Akbar Movie Fort Set catches Fire)

‘जोधा अकबर’च्या किल्ल्याचा सेट

रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील चौक येथून कर्जत कडे जाणाऱ्या मार्गावर नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ आहे. या ठिकाणी शूटिंगसाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्याच्या पाठीमागे आग लागून सेट जळाला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने धुरांचे लोट तीन ते चार किलोमीटर अंतरावरुनही दिसत होते.

फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या

कर्जत नगरपालिकेचे फायर ब्रिगेड अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या.

सुकलेल्या गवतामुळे आग पसरली

ND स्टुडिओच्या पाठीमागील बाजूला मोठ्या प्रमाणात सुकलेले गवत वणव्यामुळे पेटले. त्याची वेळीच दखल न घेतल्याने स्टुडिओच्या आतील भागातील गवत जळत जोधा अकबर चित्रपटासाठी बनवलेल्या किल्ल्याच्या सेटपर्यंत आग पोहोचली. आणि त्यात सेटच्या काही भागाला आग लागली. यामध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही.

जोधा अकबर चित्रपट

प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘जोधा अकबर’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता हृतिक रोशन यामध्ये अकबराच्या तर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोधाबाईंच्या मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जादू केली होती.

संबंधित बातम्या :

विद्युत सर्किटला आग लागल्याने भांडुप मॉलमधील दुर्घटना, अग्निशमन दलाच्या अहवालातील महत्त्वाची माहिती

Navi Mumbai | नवी मुंबईतील रंग बनवणाऱ्या बालाजी कंपनीला आग

(Nitin Desai ND Studio Raigad Khalapur Jodha Akbar Movie Fort Set catches Fire)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.