मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : दिग्गज कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतः उभ्या केलेल्या स्टुडीओमध्ये अखेरचा श्वास घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे. आर्थिक तंगीमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा रंगत आहेत. बुधवारी सकाळी नितीन देसाई यांनी स्वतःच उभारलेल्या स्टुडीओमध्ये स्वतःचं जीवन संपवलं आहे. कर्जत येथील एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या निधनानंतर पोलिसांची पहिला प्रतिक्रिया समोर येत आहे.
‘आज सकाळी ९ वा. दरम्यान एनडी स्टुडीओमध्ये नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकलेला आढळून आला. खालापूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फॉरेन्सीक टीम, सायबर फॉरेन्सीक टीम, डॉग स्कॉड आणि फिंगर प्रिंट टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांकडून प्रत्येक पैलू तपासून घेण्यात येत आहेत.’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनामुळे चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. स्वतः उभ्या केलेल्या स्टुडीओमध्ये जीवन संपवल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीस घटनास्थळी पोहोले असून अधिक चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. प्रथम मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या निधनामागचं कारण समजू शकेल. अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, पोलिसांचा तपास सुरु आहे.
नितीन देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
‘ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.’
‘कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबींयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली… असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.