नितीन देसाई यांच्या डोक्यावर इतक्या कोटींचा कर्ज; व्याजामुळे रकमेत मोठी वाढ झाली आणि…
कर्जाचा डोंगर, त्यावरच्या भरमसाठ व्याजाने नितीन देसाई खचले; रात्री स्टुडिओत गेले ते परत आलेच नाही... सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या निधनामुळे खळबळ माजली आहे.
मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : दिग्गज कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी बुधवारी सकाळ ४.३० च्या सुमारास स्वतःचं जीवन संपवलं आहे. आर्थिक तंगीमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा रंगत आहेत. पोलीस देखील प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. पण आर्थिक अडचणी वाढल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एका कंपनीकडून नितीन देसाई यांनी तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एक प्रस्ताव केला होता. कर्ज घेताना नितीने देसाई ज्या जमिनी, मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. त्यांची मालमत्ता जप्त करून आमची कर्जवसुली करुन द्या आसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. ती कारवाई नितीन देसाई यांच्यावर प्रलंबित आहे. त्यामुळे नितीन देसाई मानसिक त्रासात असावे अशी चर्चा समोर येत आहे.
एडलव्हाईज कंपनी ही फायनान्स देणारी मोठी कंपनी आहे. त्या कंपनीकडून नितीन देसाई यांनी काही वर्षांपू्र्वी १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्ज घेत असताना त्यांच्या काही जमिनी आणि मालमत्ता तारण ठेवल्या होत्या. तारण ठेवलेल्या मालमत्तेतून आमची कर्जवसुली करुन द्या. असा प्रस्ताव जिल्हाधीकाऱ्यांकडे सप्टेंबर महिन्यात ठेवण्यात आला होता. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
आता नितीन देसाई यांनी स्वतःला संपवलं आहे आणि या मागे आर्थिक विवंचनेचं कारण आहे का? अशी देखील चर्चा रंगत आहे. नितीन देसाई यांचे निकटवर्तीय देखील याबद्दल बोलताना दिसत आहेत. ते मानसिक त्रासामध्ये होते शिवाय अनेक अनेक अडचणींचा नितीन देसाई सामना करत होते.. अशी माहिती समोर येत आहे. घटनास्थळी नितीन देसाई यांचे कुटुंबिय देखील दाखल झाले.
नितीन देसाई यांच्यावर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई प्रलंबित होती. घेतलेलं कर्ज फेडणं अपेक्षित होतं. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना कमा मिळत नव्हती… अशी माहिती देखील समोर आहे. अशात नितीन देसाई यांच्या मृत्यूला हेच कारण कारणीभूत आहे की अन्य काही कारणं आहेत. याचा तपास देखील पोलीस करत आहेत.