नितीन देसाई यांनी स्वत:ला संपवण्याआधी ‘त्या’ पाच-सहा तासात काय-काय घडलं? ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती एक्सक्लुझिव माहिती

नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या रात्री नेमकं काय घडलं याची एक्सक्लुझिव माहिती 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. देसाई हे रात्री 12 वाजता मुंबई विमानतळावर आले होते. त्यानंतर ते जवळपास 2 वाजेच्या सुमारास कर्जत येथील एनडी स्टुडिओत पोहोचले होते. त्यावेळी ते स्टुडिओतील अनेक भागात फिरले.

नितीन देसाई यांनी स्वत:ला संपवण्याआधी 'त्या' पाच-सहा तासात काय-काय घडलं? 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती एक्सक्लुझिव माहिती
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 9:58 PM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : आयुष्याची परीक्षा खरंच खूप कठीण असते. आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. खूप अडचणींचा सामाना करावा लागतो. पण या अडचणींवर मात केल्यानंतर तेच जगणं सोपं होऊन जातं. त्यामुळे अशा अडचणींचा सामना आपण करायला हवा. अडचणींच्या वेळी खचून न जाता धैर्याने सामना करणं जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा अडचणींमध्ये असताना आपण नैराश्यात जातो. त्यातून आपण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो आणि सर्व होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे इतक्या टोकाचा निर्णय कधीच घेऊ नये.

एक महत्त्वाची गोष्ट, मृत्यू हे अंतिम सत्य आहे. मृत्यूनंतर आपल्याला आयुष्य जगण्याची एकही संधी मिळत नाही. त्यामुळे इतक्या टोकाचा निर्णय घेऊ नये, असं सातत्याने आवाहन केलं जातं. पण काही माणसं तरीही इतक्या टोकाचा निर्णय घेतात. ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी असाच निर्णय घेतला आणि कला विश्वात मोठी पोकळी निर्माण केली. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांसह देशाचं वैयक्ति फार मोठं नुकसान झालंय. देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन स्वत:ला संपवलं.

नितीन देसाई यांनी ज्या रात्री आत्महत्या केली त्या रात्री त्यांनी काय-काय केलं, ते कुठे गेले, कुणाशी बोलले याचा सविस्तर तपशील आता पोलीस तपासातून समोर आला आहे. विशेष म्हणजे काही ऑडिओ क्लिपदेखील पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी काय-काय म्हटलंय, तसेच त्यांच्या आत्महत्येआधीचा चार ते पाच तासांपूर्वीचा घटनाक्रम काय होता, याची एक्सक्लुझिव माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

स्टुडिओत पोहोचताच मंदिरात दर्शन, मग सलमान हवेलीत प्रवेश

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई आत्महत्येच्या रात्री बाहेरगावातून मुंबईत आले होते. ते रात्री 12 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर ते रात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास कर्जतमधील त्यांच्या ND स्टुडिओमध्ये पोहोचले. स्टुडिओमध्ये पोहोचताच आतमध्ये असणाऱ्या एका मंदिरात त्यांनी रात्रीच्या वेळी दर्शन घेतलं.

मंदिरात दर्शन घेऊन ते राहत असलेल्या त्यांच्या बंगल्यात गेले. विशेष म्हणजे या बंगल्याचे नाव सलमान हवेली आहे. या हवेलीत अभिनेता सलमान खान अनेक सिनेमांच्या शूटिंगदरम्यान राहायचा. त्यामुळे या हवेलीला त्यांनी सलमान हवेली, असं नाव दिलं होतं. याच हवेलीत सध्या नितीन देसाई यांच वास्तव्य होतं.

रात्री 3 वाजता स्टुडिओतील काही भाग फिरले

नितीन देसाई रात्री 3 वाजता स्टुडिओतील काही भाग फिरले. त्यांचा अटेंडन्ट योगेश ठाकूर हा त्यावेळी त्यांच्यासोबत होता. योगेश ठाकूरला घेऊन नितीन देसाई हे ‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या जुन्या सेटवर गेले. आत्महत्या करण्यासाठी जी दोरी नितीन देसाई यांनी वापरली ती महिन्याभरपूर्वीच रंगमंचावर टांगून ठेवली होती. सहकाऱ्यांनी याबाबत प्रश्न विचारला असता वास्तुशास्त्राचा भाग असल्यामुळे ही दोरी टांगलीय असं त्यांनी उत्तर दिलं होतं.

नितीन देसाई आत्महत्येआधी तीन वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी पाहणी केली. आत्महत्येसाठी वापरलेली दोरी, बाजूला वर चढण्यासाठी असणारी शिडी आणि आत्महत्येचा ठिकाणी दोरीच्या साहाय्याने बनवलेला धनुष्यबाणाची प्रतिकृती हे सगळं त्यांनी आधीच बनवून ठेवलं होतं. नितीन देसाई यांची ही तयारी पाहता त्यांनी आधी आत्महत्येचा विचार केला असावा, अशी शक्यता आहे.

सगळं पाहून झाल्यावर तो स्टुडिओ बंद करण्यास सांगितला आणि…

नितीन देसाई यांनी हे सगळं पाहून झाल्यावर तो स्टुडिओ बंद करण्यास सांगितला आणि चावी स्वतःकडे ठेवली. त्यानंतर ते पुन्हा त्यांचा सहकारी योगेश ठाकूर याला घेऊन सलमान हवेलीत आले. त्यांनी त्याच्याकडे व्हॉईस रेकॉर्डर दिला आणि सकाळी हे ऐकून त्यांच्या वकील आणि बहिणीला सर्व ऑडिओ पाठवायला सांगितले.

योगेश ठाकूर रात्रीच साऊंड रेकॉर्डर घेऊन निघून गेला. मात्र 20 मिनिटातच त्यांनी व्हॉईस रेकॉर्डर घेऊन परत बोलावलं आणि पुन्हा काहीतरी रेकॉर्ड करायचं आहे, असं सांगितलं. देसाई यांनी व्हॉईस रेकॉर्डर घेऊन स्वतःकडे ठेवला आणि सहकारी योगेश ठाकुरला सकाळी तो ऑफिसमधून घे अशा सूचना दिल्या. नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपचा शेवट हा ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ असा आहे.

सकाळी योगेश ठाकूर स्टुडिओत आला आणि…

दरम्यान, सकाळी योगेश ठाकूर लवकर स्टुडिओत आला त्यावेळी नितीन देसाई त्यांच्या हवेलीत नव्हते. योगेश त्यांना इकडेतिकडे शोधत असताना त्याला व्हॉईस रेकॉर्डरविषयी त्यांनी दिलेला निरोप आठवला. योगेश ठाकूरने त्यांच्या कार्यालयातून तो साऊंड रेकॉर्डर घेतला आणि कम्प्युटरवरून सर्व ऑडिओ क्लिप मोबाईलवर घेऊन वकील आणि बहिणीला पाठवल्या.

यानंतर मध्येच त्याने पहिली ऑडिओ क्लिप प्ले केल्यावर लालबागच्या राजाला माझा शेवटचा नमस्कार हे ऐकायला मिळालं आणि त्याला धक्का बसला. यानंतरच योगेश ठाकुरने स्टुडिओत धाव घेऊन पाहिल्यावर देसाई यांनी आत्महत्या केल्याचं पाहायला मिळालं.

व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले ऑडिओ हे आत्महत्येच्या रात्रीचे नाही तर…

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती म्हणजे नितीन देसाई यांनी त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले ऑडिओ हे आत्महत्येच्या रात्रीचे नाही तर आधीपासून टप्प्याटप्प्याने रेकॉर्ड केलेले आहेत. नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपची संख्या ही जवळपास 11 इतकी आहे. रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिप या काही 20 मिनिट, 12 मिनिटे तर काही ठराविक मिनिटांच्या आहेत. काही ऑडिओ क्लिप ब्लँक असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

पहिल्या ऑडिओ क्लिपची सुरुवात नितीन देसाई “लालबागच्या राजाला अखेरचा नमस्कार” अशी करतात आणि त्यानंतर भावनिक होऊन बोलायला सुरुवात करतात. नितीन देसाई यांनी त्यांच्या सुरुवातीच्या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतःचा जीवनप्रवास मांडायला सुरुवात केलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी रंगमंचावरील त्यांच्या कामाची सुरुवात आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी मिळवलेलं यश, या गोष्टी त्यांनी विस्तृतपणे मांडल्या आहेत.

नितीन देसाई स्वतःपेक्षा जास्त जीवापाड प्रेम ND स्टुडिओवर करत असल्याचं त्यांनी स्टुडिओत नमूद केलंय. त्यांनी स्टुडिओ कसा उभा केला? आयुष्यभरात त्यांनी कमावलेली ही अमूल्य संपत्ती, त्यांनी कशी उभारली आणि ती कशी अनेक संकटांचा सामना करत जतन केली? हे विस्तृत मांडलं आहे. मात्र त्यांनी हे सगळं मांडल्यानंतर एडलवाईज कंपनीवर अनेक आक्षेप नोंदवले आहेत. नितीन देसाई यांनी घेतलेल कर्ज आणि त्यानंतर कर्जवसुलीची एकूणच कार्यपद्धत आणि प्रक्रिया यावर आक्षेप घेत एडलवाईज कंपनीवर अनेक गंभीर असे आरोप केले आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.