Nitin Desai : वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांचा मृत्यू; पत्नी आणि मुलीचंही इंडस्ट्रीशी कनेक्शन
वाढदिवसापूर्वी नितीन देसाई यांनी घेतला स्वतःला संपवण्याचा निर्णय; पत्नी आणि मुलीबद्दल देखील मोठी माहिती समोर... सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या निधनाची चर्चा...

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी स्वतःला संपवलं. स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी शेवटचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडीओमध्ये कर्मचाऱ्यांना आढळून आला. वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. ९ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांचा वाढदिवस आहे.
वाढदिवसाच्या चार दिवस आधी नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.. असं म्हणायला हरकत नाही. नितीन देसाई यांनी फक्त सिनेमांमध्येच नाही तर, टीव्ही विश्वात देखील मोलाचं कार्य केलं आहे.
१९९१ साली नितीन देसाई यांनी ‘चाणक्य’च्या माध्यमातून टीव्ही विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नितीन देसाई यांनी ‘बिग बॉस’साठी देखील सेट उभारला होता. ‘देवदास’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या सिनेमांसाठी सेट तयार करणाऱ्या नितीन देसाई यांच्या कुटुंबाचं देखील इंडस्ट्रीशी कनेक्शन आहे.
नितीन देसाई यांच्या पत्नीचं नाव नयना नितीन देसाई आहे. नयना देसाई एक निर्मात्या आहेत. त्यांनी २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या Truckbhar Swapna सिनेमाची निर्मिती केली होती. ‘देवदास’ पासून ते ‘लगान’ सिनेमांपर्यंत राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या नितीन देसाई यांना एक भाऊ आणि बहिणीचं नाव वैशाली असं आहे.
नितीन देसाई आणि नयना देसाई यांच्या मुलांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव मानसी देसाई असं आहे. माणसी देसाई प्रोडक्शन कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहे. २००५ मध्ये देसाई यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली होती. त्याच सेटवर नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला.
नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.