निवेदितांनी बनवली लक्ष्मीकांत बेर्डेची सर्वांत आवडती डिश; ‘हा’ पदार्थ कधीही खायची लक्ष्याची होती तयारी

निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांना स्वयंपाकाची फार आवड आहे. विविध पदार्थ बनवून त्यांच्या रेसिपीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

निवेदितांनी बनवली लक्ष्मीकांत बेर्डेची सर्वांत आवडती डिश; 'हा' पदार्थ कधीही खायची लक्ष्याची होती तयारी
Nivedita Saraf and Laxmikant Berde
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 11:48 AM

अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. अभिनयक्षेत्रात काम करता करता त्या आपली ही आवड आवर्जून जोपासतात. दर आठवड्याला विविध पदार्थांची रेसिपी शूट करून त्या त्यांच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतात. यंदाच्या आठवड्यात त्यांनी एक खास पदार्थ बनवला आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेच्या (Laxmikant Berde) आवडीचा होता. या रेसिपीचा व्हिडीओ पोस्ट करत असताना निवेदिता यांनी लक्ष्यासोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. ‘ही रेसिपी माझ्या हृदयाजवळची आहे, कारण माझा जिवलग मित्र लक्ष्मीकांत बेर्डेची ही अत्यंत आवडती डिश होती. ही आगरी डिश बनवण्यास सोपी असून ती चविष्टसुद्धा आहे’, असं कॅप्शन लिहित त्यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. (Nivedita Saraf’s recipes)

लक्ष्याचा हा आवडता पदार्थ कोणता?

“माझ्या जवळच्या मित्राचा, बालमित्राचा आवडता पदार्थ होता. तो बालमित्र म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्यासोबत मी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. माझं लग्न झाल्यानंतर आम्ही १० वर्षे एकमेकांचे शेजारी होतो. लक्ष्याला खोबऱ्यातली सुरमई खूप आवडायची. नाश्ता असो, दुपारचं जेवण असो, संध्याकाळी असो किंवा मग रात्रीच्या जेवणात असो, ही डिश कधीही खायची त्याची तयारी असायची,” असं निवेदिता यांनी सांगितलं. निवेदिता यांची ही रेसिपी नेटकऱ्यांनाही खूप आवडली असून अनेकांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

निवेदिता सराफ यांची ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती. या मालिकेत त्यांनी आसावरीची भूमिका साकारली होती. मालिकेच्या भूमिकेतही त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं होतं. “मला जेवण करून लोकांना खायला घालायला खूप आवडतं. अनेकजण माझ्या घरी मी बनवलेले पदार्थ चाखून जातात. त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं”, असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. लॉकडाउनमध्येही त्या विविध पदार्थ बनवून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.