Tripti Dimri: ‘तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तिच्यासोबत लग्न…’, तृप्ती डिमरीचा मोठा खुलासा

| Updated on: Sep 20, 2024 | 11:01 AM

Tripti Dimri: जेव्हा तृप्ती डिमरी हिच्या आई - वडिलांना नातेवाईक आणि लोकांना मारले टोमणे; अभिनेत्री मोठा खुलासा करत म्हणाली, 'तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तिच्यासोबत लग्न...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Tripti Dimri: तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तिच्यासोबत लग्न..., तृप्ती डिमरीचा मोठा खुलासा
Follow us on

अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. ‘ॲनिमल’ सिनेमानंतर एका रात्रीत अभिनेत्री सोशल मीडिया सेंसेशन झाली. पण अभिनेत्री प्रवास फार सोपा नव्हता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खुद्दल तृप्ती हिने मोठा खुलासा केला आहे. शिवाय नातेवाईक आणि लोकांनी आई – वडिलांना मारलेल्या टोमण्यांबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत तृप्ती डिमरी म्हणाली, ‘मी उत्तराखंड येथील आहे. पण माझा जन्म दिल्ली येथे झाला. माझं शिक्षण देखील दिल्लीत झालं. माझं कुटुंब आणि आई – वडील दिल्लीत आहेत. मी जेव्हा मुंबईत आली तेव्हा हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. प्रत्येक दिवशी 50 – 60 लोकांच्या समोर बाहेर जावं लागत होते. समाज आणि कुटुंबातील लोकांनी माझ्या आई – वडिलांवर टीका केलीय. टोपणे मारले.’

 

 

पुढे तृप्ती म्हणाली, ‘लोकं म्हणायची कोणत्या धंद्यात मुलीला ढकललं आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस होईल. वाईट लोकांच्या सोबत राहिल्यामुळे तिचे निर्णय चुकतील. तिच्यासोबत कोणीच लग्न करणार नाही…’ सतत होत असलेल्या टीकेमुळे तृप्ती हिच्या आपेक्षा देखील संपल्या होत्या.

‘विचार करा तुम्ही झोपेतून उठला आहात आणि तुमच्याकडे काम करायला काहीही नाही. पण मला माझ्या विश्वास होता, की मी काही तरी करुन दाखवेल. पुन्हा घरी झावून आई – वडिलांना म्हणणार नाही की, मला काहीही करता आलं नाही….’ असं देखील तृप्ती म्हणाली.

तृप्तीबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तृप्ती हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्घीमध्ये मोठी वाढ झाली. नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्धी झोतात आल्येल्या तृप्तीला चाहते ‘भाभी 2’ नावाने ओळखू लागले. एका तृप्ती प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

तृप्ती डिमरी हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तृप्ती आणि अभिनेता राजकुमार राव फेम ‘विकी विद्या का वो वाला वीडियो’ सिनेमाची ट्रेलर प्रदर्शित झाला. 11 ऑक्टोबर रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 3’ सिनेमात देखील तृप्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहेत.