‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध सेलिब्रिटीची तब्बल 5 तास चौकशी, तो म्हणाला, ‘मला फसवलं आणि…’

Bigg Boss : मंगळवारी रात्री 11 वाजता 'बिग बॉस' फेम सेलिब्रिटीची तब्बल 5 तास चौकशी; अडचणी वाढण्याची शक्यता... संबंधीत प्रकरणात 5 जणांना अटक, पोलीस करत आहेत कसून चौकशी, धक्कादायक माहिती समोर

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध सेलिब्रिटीची तब्बल 5 तास चौकशी, तो म्हणाला, 'मला फसवलं आणि...'
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 11:42 AM

मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : प्रसिद्ध युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोचा विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवल्याप्रकरणी एल्विश याला नोटीस पाठवण्यात आली होती. आता याप्रकरणी नवी अपडेट समोर येत आहे. मंगळवारी रात्री नोएडा पोलिसांनी एल्विश याची तब्बल पाच तास चौकशी केली. पण अद्याप एल्विश याची चौकशी पुर्ण झालेली नाही. आज म्हणजे बुधवारी देखील एल्विश याची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. परिस्थिती पाहाता एल्विश याच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादव याचं नाव आल्यापासून त्याच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. नोएडा पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. नुकताच याप्रकरणी एल्विशची चौकशी करण्यात आली. सध्या सर्वत्र एल्विश यादव याची चर्चा रंगली आहे…

काय म्हणाला एल्विश?

चौकशी दरम्यान एल्विश म्हणाला, ‘मी काहीही चूक नाही. मी निर्दोष आहे. मला फसवलं जात असून कट रचण्याचा प्रयत्न आहे…’ याप्रकरणी आता कोणती माहिती समोर येईल या प्रतीक्षेत अनेक जण आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी गायक फैजलपुरिया याला देखील नोटीस बजावली आहे.

काय आहे प्रकरण?

रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी एल्विश यादव याच्यासह सहा जणांवर सापाच्या विषाची तस्करी केल्याचे आरोप केले आहे. याप्रकरणाने गेल्या दोन दिवसांत अनेक वळणं घेतली आहेत. एवढंच नाही तर, याप्रकरणी पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे.

आता पोलीस सतत एल्विश याची चौकशी करत आहेत. एजंट राहुल यादवला रिमांडवर घेऊन एल्विश यादवची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. एल्विशची आणखी काय चौकशी होणार आणि पोलिस याप्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणे महत्ताचं ठरणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी 2’ शोचा विजेता ठरल्यानंतर एल्विश तुफान चर्चेत आला. एल्विश बिग बॉसच्या घरात त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठे खुलासे करताना दिसला. ज्यामुळे एल्विश प्रसिद्धी झोतात आला. सोशल मीडियावर देखील एल्विश कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.