‘दिग्दर्शकाने घरी बोलावलं आणि…’, ऑडिशनसाठी गेल्यानंतर Nora Fatehi हिला आलेला धक्कादायक अनुभव

दिलबर गर्ल नोरा फतेही हिने केला आयुष्यातील वाईट प्रसंगांचा खुलासा; ऑडिशनसाठी दिग्दर्शकाच्या घरी गेल्यानंतर अभिनेत्रीला आलेला अनुभव प्रचंड धक्कादायक

'दिग्दर्शकाने घरी बोलावलं आणि...', ऑडिशनसाठी गेल्यानंतर Nora Fatehi हिला आलेला धक्कादायक अनुभव
'दिग्दर्शकाने घरी बोलावलं आणि...', ऑडिशनसाठी गेल्यानंतर Nora Fatehi हिला आलेला धक्कादायक अनुभव
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 10:28 AM

मुंबई : अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोराने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं जे स्थान स्थापन केलं आहे, ती इच्छा प्रत्येक नव्या कलाकाराची असते. नोराने आपल्या डान्स आणि घायाळ अदांनी चाहत्यांना थक्क केलं. पण एक सामान्य मुलगी ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास नोरासाठी प्रचंड अवघड होता. यशाच्या शिखरावर चढत असताना नोराला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. पण नोराने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कलाविश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. नोरा आज अनेक नव्या अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी आहे.

एका मुलाखतीत नोराने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सर्वांसोबत शेअर केला. शिवाय भुतकाळात घडलेल्या गोष्टी सांगताना नोरा भावुक देखील झाली. नोराने सांगितलं, ‘मी एकदा ऑडिशनसाठी दिग्दर्शकाच्या घरी गेली होती. तेव्हा त्या दिग्दर्शकाने मला वाईट वागणूक दिली.’

नोरा जेव्हा महिला कास्टिंग दिग्दर्शकांच्या घरी ऑडिशनसाठी गेली, तेव्हा अभिनेत्रीला पाहिल्यानंतर दिग्दर्शक महिला भडकली आणि म्हणाली, ‘फिल्म इंडस्ट्री तुमच्यासारख्या व्यक्तींमुळे अडचणीत आहे. तुम्ही सर्व ठिकाणी आहात. आम्हाला तुझ्या सारखी लोकं नकोत..’ या घटनेनंतर नोरा निघून गेली.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

कास्टिंग दिग्दर्शकांकडून झालेला अपमान सांगताना नोरा रडू लागली. शिवाय हिंदी येत नसल्यामुळे देखील नोराला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अनेकदा आलेल्या अपयशानंतर नोराने मोठ्या जिद्दीने बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्थान पक्क केलं आहे.

नोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने म्यूझिक एल्बमपासून सिनेमांपर्यंत स्वतःची जादू दाखवली आहे. ‘नाच मेरी रानी’, ‘गर्मी’ यांसारख्या गाण्यांमुळे नोरा कायम प्रसिद्धीझोतात राहिली. चाहते कायम नोराच्या डान्सचं कौतुक करताना दिसतात.

चाहत्यांच्या मनात असलेली नोरा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात नोरा ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे याप्रकरणी नोराला दिलासा मिळेल की अभिनेत्रीच्या अडचणी वाढतील हे येणारा काळच सांगेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.