आर्यन खानला डेट करतेय नोरा फतेही? खास फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
नोरा - आर्यनचा खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल; दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा
मुंबई : बॉलिवडमध्ये सेलिब्रिटींच्या प्रेम प्रकरणांमुळे तुफान चर्चा रंगत आहे. आता अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अभिनेत्री नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या दोघांचा एक फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आर्यन आणि नोरासोबत दोघांचे अन्य मित्र देखील दिसत आहेत. पण आर्यन आणि नोरा यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नोरा आणि आर्यन यांचे पार्टीतील फोटो व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांनी फोटोवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. सध्या नोरा आणि आर्यनच्या फोटोमुळे रंगणाऱ्या चर्चांना उधाण आलं आहे. आर्यन व नोराच्या कॉमन मित्राद्वारे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
पण फोटोमध्ये नोरा आणि आर्यन एकत्र दिसल्यामुळे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. रंगणाऱ्या चर्चांवर आर्यन आणि नोराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
View this post on Instagram
आर्यन खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ड्रग्स प्रकरणातून दिलासा मिळाल्यानंतर आर्यनने त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. नुकताच आर्यनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये आर्यनने स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. आर्यन आता शुटिंगच्या प्रतीक्षेत आहे.
तर दुसरीकडे नोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच ‘एन ऍक्शन हीरो’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. आता अभिनेत्री आगामी सिनेमा ‘100 पर्सेंट’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच नाही, तर नोरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.