Nora Fatehi हिला झालं तरी काय? ‘दिलबर गर्ल’ला चालता देखील येईना.. पाहा व्हिडीओ
नोरा फतेही हिला नक्की झालं तरी काय; अभिनेत्रीला चालणं देखील झालं आहे कठीण... व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल..., सर्वत्र भक्त आणि फक्त नोराच्याच चर्चा...
मुंबई : ‘मुकाबला’, ‘ओ साकी साकी’, ‘स्लो मोशन’, ‘कुसू कुसू’, ‘दिलबर दिलबर’ यांसारख्या हीट गाण्यांवर भन्नाट डान्स करुन अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनात स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडची ‘दिलबर गर्ल’ म्हणून देखील अभिनेत्रीची ओळख आहे. नोराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. नोराची एक झलक पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. महत्त्वाचं म्हणजे, नोरा देखील चाहत्यांना कधी नाराज करत नाही. चाहत्यांना पाहिल्यानंतर नोरा काहीवेळ थांबते आणि चाहत्यांसोबत गप्पा मारते.. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे असंख्या फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.. आता देखील नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे..
नोराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, अभिनेत्री अशी का चालत आहे? नुकताच अभिनेत्री नोरा फतेही हिने अबू धाबीत सुरु असलेल्या ‘आयफा’ (IIFA 2023) पुरस्करा सोहळ्यात हजेरी लावली. पुरस्करा सोहळ्यात प्रत्येकाची नजर सेलिब्रिटींच्या हटके लूककडे असते.. आयफा पुरस्कार सोहळ्यात नोराच्या ड्रेसकडे देखील चाहत्यांच्या येवून थांबल्या..
View this post on Instagram
पण आयफा पुरस्कार सोहळ्यातील लूकमुळे अभिनेत्री ट्रोलिंगचा शिकार झाली आहे.. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नोराला ड्रेस आणि हाय हिल्समुळे चालता देखील येत नसल्याचं दिसत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.. ड्रेसमध्ये अभिनेत्रीला चालणं देखील कठीण झाल्याचं दिसून येत आहे.. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते नोराची खिल्ली उडवत आहेत.. (Nora Fatehi iifa look)
नोरा फतेही ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. पण अभिनेत्रीला तिच्या डान्स आणि ग्लॅमरस लूकमुळे ओळखलं जातं. नोराने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे…
नोराच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. सोशल मीडियावर देखील नोराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय सोशल मीडियावर स्वतःचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, नोराच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.