Nora Fatehi : नोरा फतेहीने सांगितलं तिचं ‘डर्टी लिटल सीक्रेट’! नेमकं काय म्हणाली तुम्हीच वाचा
नोराने अलीकडेच तिचं नवं गाणं 'डर्टी लिटल सीक्रेट'द्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलंय. तिने याबाबतचा आपला अनुभव इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितला. नोराने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पडद्यामागील गुजगोष्टी शेअर केल्या आहेत.
मुंबई : आपल्या डान्स स्टाईलने बॉलिवूडमध्ये (Bollywood) वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या आणि हजारो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या नोरा फतेहीने (Nora Fatehi) तिचं एक ‘डर्टी लिटल सीक्रेट’ सांगितलं आहे. आश्चर्चचकीत झालात ना… पण तिचं सीक्रेट डर्टी नक्कीच नाही. तर नोराने अलीकडेच तिचं नवं गाणं ‘डर्टी लिटल सीक्रेट’द्वारे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलंय. तिने याबाबतचा आपला अनुभव इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितला. नोराने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये पडद्यामागील गुजगोष्टी शेअर केल्या आहेत.
नोराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याला तिने नवीन ‘डर्टी लिटल सीक्रेट’ असं कॅप्शन दिलंय. मी पहिल्यांदाच म्युझिक व्हिडीओ दिग्दर्शित करतेय. हा एक चांगला शिकवणारा अनुभव होता. बायोमध्ये माझ्या यूट्युब चॅनल लिंकवर म्युझिक व्हिडीओ पाहा, अशी पोस्ट नोराने केलीय.
View this post on Instagram
तिच्या पहिल्या पोस्टमध्ये नोरा एका खुर्चीवर बसलेली पाहायला मिळतेय. यात तिने हातात माईक घेतला आहे. तर ती बसलेल्या खुर्चीवर डायरेक्टर नोरा असं लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या दोन फोटोमध्ये नोरा कॅमेरात शॉट्स तपासताना दिसून येत आहे.
नोराने पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांत अनेक अभिनेते आणि डान्सर्सनी ती लाईक करत अभिनंदनाच्या कमेंट्सही केल्या आहेत. ‘भुज – द प्राईड ऑफ इंडिया’तील अभिनेत्यानेही दिग्दर्शनातील पदापर्णाबद्दल तिचं अभिनंदन केलं. तसंच भविष्यातही दिग्दर्शक म्हणून तुझं काम पाहायचं आहे, अशी कमेंट केलीय.
नोराच्या यूट्युब चॅनलवर ‘डर्टी लिटल सीक्रेट’ या गाण्याचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. ‘स्ट्रीट डान्सर 3D’ तील अभिनेत्याने गायक झॅक नाईटसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यूट्युबवर या व्हिडीओला आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एक उत्तम डान्सर म्हणून बॉलिवूड आणि कलाविश्वात नोराची ओळख आहे. ती सध्या ‘डान्स दिवाने ज्युनियर’ या रिअॅलिटी शोमध्ये जज आहे.
View this post on Instagram