‘मेरे हसबंड की बीवी’, ‘मटरू की बिजली की मंडोला’ आणि.. अतरंगी नावांचे हे चित्रपट माहीत आहेत का ?
अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकर यांचा 'मेरे हसबैंड की बीवी' हा चित्रपट येत्या काही दिवसात येणार आहे. या चित्रपटाचे नाव थोडे वेगळे आहे. मात्र हा वेगळे नाव असलेला पहिला चित्रपट नसून या आधीही अशा अनोख्या नावाचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. जाणून घेऊया असेच अनोखे नाव असलेल्या चित्रपटांबद्दल.
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर हा पुढच्या महिन्यात ‘मेरे हसबैंड की बीवी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अर्जुन कपूर सोबत या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग देखील आहेत. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. निर्मात्यांनी या चित्रपटाला अनोखे नाव दिले आहे. ‘मेरे हसबैंड की बीवी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट सध्या त्याच्या अनोख्या नावामुळे चर्चेत आहे. मात्र अर्जुन कपूर हा चित्रपटाचे अनोखे नाव घेऊन येणारा पहिला अभिनेता नाही तर या आधीही अनेक अभिनेत्यांनी चित्रपटाचे अनोखे नाव घेऊन चित्रपट आणले आहेत. जाणून घेऊया अशाच चित्रपटांबद्दल ज्यांची नावे अनोखी आहेत.
अतरंगी रे
सुरुवात करूया अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटापासून. या चित्रपटाचे नाव ‘अतरंगी रे’ होते. आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटांमध्ये अक्षय कुमार सोबत सारा अली खान आणि धनुष देखील होते. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता ज्याने लोकांना खूप हसवले.
मटरू की बिजली का मंडोला
‘मटरू की बिजली का मंडोला’ हा चित्रपट 2013 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव थोडे वेगळे आहे. हा चित्रपट कॉमेडी आणि ड्रामा होता. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि आमिर खानचा भाचा इमरान खान मुख्य भूमिकेत होता. विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
डेढ़ इश्किया
अभिषेक चौबे यांनी 2014 मध्ये डेढ़ इश्किया हा चित्रपट आणला होता. माधुरी दीक्षित, हुमा कुरेशी, नसरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी या चित्रपटात होते.
सस्ती दुल्हन महंगा दुल्हा
जुन्या काळात देखील अनोख्या नावाचे चित्रपट येत होते. 1986 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला ज्याचे नाव ऐकूनच प्रेक्षकांना हसायला येत होते. तो चित्रपट म्हणजे ‘सस्ती दुल्हन महंगा दुल्हा’. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आदित्य पंचोली हा होता.
बढ़ती का नाम दाढ़ी
‘चलती का नाम गाडी’ हा चित्रपट तुम्हाला माहिती असेलच. हा चित्रपट 1958 मध्ये आला होता. या चित्रपटाच्या काही वर्षानंतर असाच आणखीन एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याचे नाव केवळ या चित्रपटासारखा नव्हते तर ते अगदी अद्वितीय होते. तो चित्रपट म्हणजे 1974 साली प्रदर्शित झालेला ‘बढ़ती का नाम दाढ़ी’ हा होता.