मुंबईतच नाही परदेशातही शाहरुखचे बंगले, करोडोमध्ये आहे किंमत
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा 2 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. देश-विदेशात देखील त्याचे आलिशान बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत करोडोंमध्ये आहेत. दुबई, लंडन आणि इतक ठिकाणी देखील त्यांचे घर आहे.
Follow us
मुंबईतील वांद्रे येथे असलेली मन्नत ही शाहरुख खानकडे असलेली सर्वात महागडी वस्तू आहे. किंग खान पत्नी गौरी खान आणि मुलांसह येथे राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 27,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या आणि 6 मजले असलेल्या या आलिशान बंगल्याची किंमत आज 200 कोटी रुपये आहे.
शाहरुखचा लंडनमध्ये आलिशान बंगला आहे. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी तो अनेकदा लंडनमधील या घरात जातो. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा हा व्हिला सेंट्रल लंडनच्या पॉश एरिया पार्क लेनमध्ये आहे आणि त्याची किंमत 183 कोटी रुपये आहे.
शाहरुख खानचा दुबईतील पाम जुमेराह व्हिला देखील हा राजवाड्यापेक्षा कमी नाही. शाहरुख खानचा हा विला दुबईतील पाम जुमेराह या त्याच्या खाजगी बेटावर आहे. 6 बेडरूम, दोन रिमोट कंट्रोल गॅरेज आणि खाजगी पूल असलेल्या या व्हिलाची किंमत 100 कोटी रुपये आहे.
बादशाह शाहरुख खानचे अलिबाग हॉलिडे होम देखील खूप आलिशान आहे. 19,960 स्क्वेअर मीटरच्या समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्यात हेलिपॅडही आहे. त्याची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.