Hemangi Kavi: ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’; हेमांगी कवीच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
हेमांगीच्या या पोस्टबद्दल एकाने तिचं कौतुकसुद्धा केला. 'काही मोजक्याच सेलिब्रिटींमध्ये राजकीय पोस्ट करण्याची हिंमत आहे. तू त्यापैकी एक आहेस, म्हणून मला आवडतेस', असं नेटकऱ्याने म्हटलंय.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. एकीकडे मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले आणखी पाच आमदार गुरुवार दिवसभरात गुवाहाटीला जाऊन शिंदेंच्या गटात दाखल झाले. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं असताना आता पुढे नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वसामान्यांसह काही सेलिब्रिटीसुद्धा या राजकीय घडामोडींबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. आरोह वेलणकर, हेमंत ढोमेनंतर आता अभिनेत्री हेमांगी कवीनेही (Hemangi Kavi) इन्स्टाग्रामवर एक उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय.
‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असा प्रश्न हेमांगीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित विचारला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तिची ही पोस्ट आहे. ‘या महाराष्ट्रात वाघ फक्त दोनच होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज’, अशी कमेंट एका युजरने केली. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच’. हेमांगीच्या या पोस्टबद्दल एकाने तिचं कौतुकसुद्धा केला. ‘काही मोजक्याच सेलिब्रिटींमध्ये राजकीय पोस्ट करण्याची हिंमत आहे. तू त्यापैकी एक आहेस, म्हणून मला आवडतेस’, असं नेटकऱ्याने म्हटलंय.
हेमांगी कवीची पोस्ट-
View this post on Instagram
महाविकास आघाडीतून बाहेर पडणं आवश्यक असल्याचं कारण सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मंगळवारी बंडाचा झेंडाचा पुकारला. काही आमदारांना घेऊन ते आधी सुरतला गेले आणि तिथून बुधवारी गुवाहाटीला गेले. बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले.