Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sameer Khakkar | ‘नुक्कड’ फेम अभिनेते समीर खक्कर काळाच्या पडद्याआड; ‘या’ कारणामुळे झालं निधन

समीर खक्कर हे बोरिवलीच्या आईसी कॉलनीमध्ये एकटेच राहायचे. त्यांची पत्नी अमेरिकेत वास्तव्यास असते. अंत्यसंस्कारासाठी समीर यांचं पार्थिव सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे.

Sameer Khakkar | 'नुक्कड' फेम अभिनेते समीर खक्कर काळाच्या पडद्याआड; 'या' कारणामुळे झालं निधन
अभिनेते समीर खक्करImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:39 AM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते समीर खक्कर यांचं निधन झालं. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 च्या दशकात दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी ‘खोपडी’ ही दारूड्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. समीर यांचे बंधू गणेश खक्कर यांनी निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. यावेळी त्यांनी निधनाचं कारणसुद्धा सांगितलं. समीर यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे मंगळवारी त्यांना बोरिवलीच्या एम. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आलं होतं. मात्र मल्टीपल ऑर्गन फेलिअरमुळे आज (बुधवार) पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. समीर यांच्या पार्थिवावर बोरिवलीच्या बाभई नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

समीर खक्कर हे बोरिवलीच्या आईसी कॉलनीमध्ये एकटेच राहायचे. त्यांची पत्नी अमेरिकेत वास्तव्यास असते. अंत्यसंस्कारासाठी समीर यांचं पार्थिव सकाळी 11 वाजताच्या सुमारास स्मशानभूमीत नेण्यात येणार आहे. ते अखेरचे ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फर्जी’ या वेब सीरिजमध्ये झळकले होते.

हे सुद्धा वाचा

समीर यांनी मनोरंजन, सर्कस (शाहरुख खानसोबत) यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. याशिवाय परिंदा, इना मिना डिका, दिलवाले, राजा बाबू, आतंक ही आतंक, शहनशाह, अव्वल नंबर, हम है कमाल के यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.