प्रसिद्ध अभिनेत्रीने रस्त्यावर मागितली भिक्षा; आलिशान जगणं सोडून स्वीकारला संन्यास

झोपडीत राहून, मंदिरात भजन गाऊन जगतेय जीवन

प्रसिद्ध अभिनेत्रीने रस्त्यावर मागितली भिक्षा; आलिशान जगणं सोडून स्वीकारला संन्यास
Nupur AlankarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 1:46 PM

मुंबई- प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री नुपूर अलंकार (Nupur Alankar) यांनी आलिशान लाइफस्टाइल सोडून संन्यास स्वीकारला आहे. याविषयीचे अपडेट्स त्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगत असतात. आईच्या निधनानंतर नुपूर यांनी जगण्याचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. संन्यासीच्या आयुष्यात भिक्षेचं (Bhiksha) फार महत्त्व असतं. नुपूर यांनी आयुष्यात पहिल्यांदाच भिक्षा मागितली आहे. या भिक्षेत त्यांना काय काय मिळालं, ते त्यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे.

नुपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या रस्त्यावर भिक्षा मागताना दिसत आहेत. आतापर्यंत सहा जणांकडून भिक्षा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भिक्षेत लोकांनी काय दिलं, याचा फोटोसुद्धा त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. नुपूर यांना एका दिवसात 11 जणांकडून भिक्षा मागायची आहे.

हे सुद्धा वाचा

“आज भिक्षाटनचा पहिलाच दिवस आहे. संन्यासमध्ये भिक्षाटनचा अर्थ भीक मागणे असा होतो. एका संन्यासीनेच मला सकाळचा पहिला विना साखरेचा चहा दिला. त्यानंतर मला एका व्यक्तीने 21 रुपये भिक्षा म्हणून दिले”, असं त्या म्हणाल्या.

नुपूर यांच्या या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांकडून विविध कमेंट्स येत आहेत. संन्यासी मार्ग अवलंबला असला तरी चाहत्यांपासून कनेक्शन तोडलं नाही, ही गोष्ट आवडल्याचं काही युजर्स म्हणाले. तर नुपूर यांच्या जगण्याचा नवीन मार्ग पाहून काही नेटकरी प्रभावित झाले आहेत.

ग्लॅमरच्या विश्वात आल्यानंतर आलिशान जगणं सोडणं सोपं नसतं. अशा परिस्थितीत नुपूर यांनी काही गोष्टींचा त्याग करत हे नवीन आयुष्य स्वीकारल्याचं चाहत्यांना आवडलंय. नुपूर यांनी 27 वर्षे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम केलं होतं. आईच्या निधनानंतर सांसारिक मोहमायातून मुक्त झाल्याचं त्यांनी म्हटलं. आता उर्वरित आयुष्य त्यांना देवाच्या भक्तीत व्यतीत करायचं आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.