Israel Palestine Crisis | इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा भारतात परतली, अशी झाली अभिनेत्रीची अवस्था?

| Updated on: Oct 08, 2023 | 4:01 PM

Israel Palestine Crisis | इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा परतली भारतात... अभिनेत्रीची अवस्था पाहून म्हणाल..., व्हिडीओ सर्वत्र व्हायरल.. अभिनेत्री समोर आलेल्या प्रसंगाबद्दल काय बोलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्वत्र नुसरत भरुचा हिची चर्चा...

Israel Palestine Crisis | इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा भारतात परतली, अशी झाली अभिनेत्रीची अवस्था?
Follow us on

मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : शुक्रवारी रात्री पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने इस्त्रायलवर हल्ला (Israel Palestine Crisis) चढवला. शनिवारी सकाळी पॅलेस्टाईनच्या हमास गटाने गाझा पट्टीत हल्ला तीव्र केला. युद्धादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. पण आता अभिनेत्री सुखरुप भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री हैराण दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणते, ‘सध्या प्रचंड हैराण आहे, कृपया मला घरी पोहोचू द्या..’ सध्या सर्वत्र नुसरत भरुचा हिची चर्चा रंगली आहे.

हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्री तिथे गेली होती. या फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीचा ‘अकेली’ सिनेमा दाखवण्यात आला. नुसरत हिच्यासोबत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता शेवटचा संपर्क झाला होता. त्यादरम्यान ती बेसमेंट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

 

 

अभिनेत्री इस्त्रायलमध्ये अडकल्यामुळे चाहते आणि कुटुंबिय चिंतेत होते. पण आता अभिनेत्री सुखरुप घरी परतली आहे. दरम्यान, रविवारी, अभिनेत्रीच्या टीममधील एक महिला संचिता त्रिवेदी हिने दिलेल्या माहितीनुसार, नुसरत हिच्यासोबत संपर्क होवू शकल्याचं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे चाहते आणि कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला होता..

दूतावासाच्या मदतीने नुसरत हिला सुखरूप मायदेशी परत आण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. थेट विमान मिळत नसल्यामुळे तिला कनेक्टिंग फ्लाइटच्या मदतीने भारतात आणलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व माहिती सांगण्यात आली नव्हती. पण अभिनेत्री भारतात आल्यामुळे सर्वांची चिंता मिटली आहे. आता अभिनेत्री समोर आलेल्या प्रसंगाबद्दल काय बोलेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं वक्तव्य

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, ‘आम्ही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. आमचं उद्दिष्ट साध्य होईपर्यंत हे हल्ले सुरूच राहतील. हमास गेल्या अनेक वर्षांपासून इस्त्रायली नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा आम्ही संपवणार आहोत. आम्ही देशातील नागरिकांना सुरक्षा देवू आणि आम्ही जिंकू… मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांमध्ये शत्रूंना वीज, इंधन आणि इतर वस्तूंचा पुरवठा थांबवण्याचा समावेश आहे..’