‘जनहित में जारी’! नुसरत भरुचा विकणार कंडोम; वाचा काय आहे प्रकरण

आपल्या हॉट इमेजमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री नुसरत भरुचा आता चक्क कंडोम विकणार आहे. (Nushrratt Bharuccha will soon start selling condoms in new movie)

'जनहित में जारी'! नुसरत भरुचा विकणार कंडोम; वाचा काय आहे प्रकरण
Nushrratt Bharuccha
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 4:47 PM

नवी दिल्ली: आपल्या हॉट इमेजमुळे नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री नुसरत भरुचा आता चक्क कंडोम विकणार आहे. काय? वाटलं ना आश्चर्य? अहो वाटणारच! नुसरत काय खरोखर कंडोम विकणार नाहीये. तर तिच्या ‘जनहित में जारी’ या आगामी सिनेमात ती कंडोम विकताना दिसणार आहे. त्यामुळेच तिच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. (Nushrratt Bharuccha will soon start selling condoms in new movie)

नुसरत भरुचाचा ‘प्यार का पंचनामा’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत होता. त्यानंतर तिने टाइपकास्ट इमेज तोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘अजीब दास्तांस’ या सिनेमात तिने मोलकरणीची भूमिका करून तिची ‘हॉट बेब’ची इमेज तोडण्याचं काम केलंय. आत ‘जनहित में जारी’ या आगामी सिनेमात ती कंडोम विकताना दिसणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. या सिनेमात ती एका मेडिकल दुकानात कंडोम विकणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे.

सोशल मेसेजही

नुसरतने India.com या संकेतस्थळाला एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने ‘जनहित में जारी’ हा सिनेमा विनोदी असल्याचं सांगितलं. या सिनेमात ती कंडोम सेल्स एक्झिक्युटिव्हच्या भूमिकेत आहे. या सिनेमातून विनोदाबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

छोट्या शहरातील मुलीची कथा

या सिनेमात ती एका छोट्या शहरातील मुलगी दाखवली आहे. ही मुलगी शिकलेली आणि आधुनिक विचाराची आहे. ही मुलगी नोकरीच्या शोधात असते आणि तिला कंडोम बनविणाऱ्या कंपनीत सेल्स अँड प्रमोशन एक्झिक्युटीव्हची नोकरी मिळते.

नुसरतने सध्या निवडक सिनेमे स्विकारण्यावर भर दिलेला दिसतोय. तिच्या अलिकडच्या काही सिनेमातून तिने हटके आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातून तिने आपण दमदार अभिनय करू शकत असल्याचंही दाखवून दिलं आहे. ‘छलांग’मधील शिक्षिकेची भूमिका असो की ‘अजीब दास्तांस’मधील मोलकरीण असो, तिने या भूमिका ताकदीने साकारल्या आहेत. (Nushrratt Bharuccha will soon start selling condoms in new movie)

संबंधित बातम्या:

‘TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप

PHOTO | रणवीर सिंहप्रमाणेच त्याचा लूक-अ-लाईक देखील प्रसिद्ध अभिनेता, फोटो पाहून बुचकळ्यात पडाल!

PHOTO | शाहरुखच्या लेकीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज, सुहाना खान पदार्पणापूर्वीच ठरतेय ‘बॉलिवूड क्वीन’!

(Nushrratt Bharuccha will soon start selling condoms in new movie)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.