मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता मातृत्वाचा आनंद घेत असलेल्या नुसरत जाहां एकेकाळी सामूहिक बलात्कार आपोरीच्या प्रेमात होत्या. सामूहिक बलात्कार आपोरीसोबत असलेलं नातं समोर येताच नुसरत जाहां वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. आज नुसरत जाहां वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवू, त्यांच्या अशा रिलेशनशिपबद्दल ज्यामुळे नुसरत यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली.
नुसरत जाहां ज्या गँगरेप आरोपीच्या प्रेमात होत्या त्याचं नाव कादर खान असं आहे. नुसरत आणि कादर खान यांचं लग्न देखील होणार होतं. पण लग्न होवू शकलं नाही. दरम्यान, कोलकात्याच्या पार्क स्ट्रीटमध्ये एका अँग्लो-इंडियन महिलेवर सामूहिक बलात्कार झाला. यामध्ये कादर खानसह पाच जणांचं नाव समोर आलं.
कादर खानचं नाव गँगरेपमध्ये समोर आल्यानंतर पोलीस चौकशीत नुसरत यांनी चुकीची माहिती दिली. जेव्हा कादर खानच्या शोधात पोलीस होते, तेव्हा नुसरत कादरसोबत मुंबईत लपून बसल्या होत्या. नुसरत यांच्यावर जवळपास ४ वर्ष कादर खानला लपवून ठेवण्याचे आरोप आहेत.
त्यानंतर सामूहिक बलात्काराच्या आरोपांखाली कादर खानला पोलिसांनी अटक केली. तेव्हा नुसरत यांचं नाव समोर आलं. पण त्यांच्यावर कोलकाता पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. नुसरत आणि कादर यांची कॉलेजमध्ये ओळख झाली होती. जवळपास ४ वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते.
नुसरत जाहां कायम वादग्रस्त परिस्थितींमुळे चर्चेत आल्या…
नुसरत जाहां याच्या लग्नामुळे देखील अनेक वाद निर्माण झाले. २०१९ मध्ये त्यांनी उद्योगपती निखील जैन यांच्यासोबत लग्न केलं. पण हे लग्न अधिक काळ टिकलं नाही. एक वर्षानंतर दोघे विभक्त झाले. नुसरत जाहां यांनी लग्न बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. ज्यामुळे अनेक वाद निर्माण झाले.
त्यानंतर नुसरत यांचं नाव अभिनेता यश दासगुप्तासोबत जोडलं जावू लागलं. अखेर नुसरत यांनी यशसोबत दुसरं लग्न केलं आणि २०२१ मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव ईशान आहे.