Nusrat Jahan controversy | नुसरत जहां गर्भवती, पती निखील जैन यांना माहितीच नाही! लेखिका तस्लीमा नसरीनची ‘ती’ पोस्ट व्हायरल

अभिनेत्री आणि खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गर्भवती असल्याची बातमी चर्चेत आली आहे. पण, यावेळी त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी नुसरतच्या गरोदरपणाच्या बातमीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Nusrat Jahan controversy | नुसरत जहां गर्भवती, पती निखील जैन यांना माहितीच नाही! लेखिका तस्लीमा नसरीनची 'ती' पोस्ट व्हायरल
नुसरत जहां
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 5:32 PM

मुंबई : अभिनेत्री आणि खासदार असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गर्भवती असल्याची बातमी चर्चेत आली आहे. पण, यावेळी त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी नुसरतच्या गरोदरपणाच्या बातमीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, गेल्या काही महिन्यांपासून नुसरत आणि तिचा नवरा निखिल जैन यांच्यातील नाते बिनसल्याची चर्चा होती. अभिनेता यश दासगुप्तसोबत नुसरतचे अफेयर असल्याची बातमीही चर्चेत होती. आता लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasrin ) यांनी नुसरतच्या गरोदरपणाबद्दल आपले मत मांडले आहे (Nusrat Jahan controversy Taslima Nasrin says Nusrat is pregnant and loves another man then she should divorce).

तस्लीमा नसरीन यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी नुसरतला पती निखिलपासून घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे. तस्लीमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘नुसरतच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. ती गर्भवती आहे. याविषयी तिचा पती निखिलला काहीहे माहिती नाही. दोघे सहा महिन्यांपासून विभक्त झाले आहेत. पण, अभिनेत्री नुसरत यश नावाच्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे.’

पाहा पोस्ट :

काय म्हणाल्या तस्लीमा नसरीन?

‘लोकांना असे वाटत आहे की, या बाळाचे वडील यश आहे, निखिल नाहीत. बातमी असो वा अफवा, ही परिस्थिती कायम राहिली तर, मला वाटते निखिल आणि नुसरतचे घटस्फोट घेणे चांगले नाही का?  वटवाघळाप्रमाणे लटकत्या नातेसंबंधात अडकून राहण्यात अर्थ नाही. यामुळे दोन्ही पक्षांची गैरसोय होईल.’

तस्लीमा पुढे लिहितात- ‘जेव्हा नुसरत आणि निखिलचे लग्न झाले तेव्हा ते खूप छान वाटले होते, त्याचप्रमाणे श्रीजित आणि मिथिलाचे लग्न झाल्यावर देखील मला खूप आनंद झाला होता. जर दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचा विवाह असेल, तर मी अगदी आनंदी होते.’

‘जाती धर्म वगैरे हटवायचे असेल तर वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळ्या धर्मातील लोकांना नात्यात बांधावं लागेल. हिंसाचार यापासून दूर जाऊ शकतो. पण कोणाला माहित होते की, हे प्रेमळ जोडपे एकमेकांसोबत जास्त काळ आनंद राहणार नाही!

शेवटी पुरुष ते पुरुष…

‘त्या दिवशी ब्रत्याच्या फोटोत मी नुसरतला पाहिले होते, मी नुसरतचा फोटो पहिल्यांदाच पाहिला होता. ती मुलगी अँजेलीना जोलीसारखी दिसत आहे, ती अभिनय देखील खूप चांगला करते. नक्कीच ती स्वतंत्र आहे. खरं तर, जर तुम्ही आत्मनिर्भर आणि जागरूक असाल, तर तुमच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाचे पालकही होऊ शकता.’  (Nusrat Jahan controversy Taslima Nasrin says Nusrat is pregnant and loves another man then she should divorce)

‘आपण आपल्या स्वतःच्या ओळखीनेच आपल्या मुलाचे संगोपन करू शकता. यासाठी पुरुष आजूबाजूला असण्याची गरज नाही. खरं तर निखिल आणि यश यात काय फरक आहे! शेवटी, पुरुष ते पुरुष… एका व्यक्तीला सोडून दुसर्‍याशी लग्न केल्याने आयुष्य खूप आनंदी होते. दुसरे विषारी जीवन जगण्यासाठी आपल्याला पुन्हा लग्न करावे लागेल का? मग ही शर्यत संपणार नाही, इच्छित व्यक्तीशी देखील आपले जुळत नाही. स्वतंत्र स्त्रीच्या स्वप्नातील माणूस वास्तवात नव्हे तर कल्पनेतच असतो.’

तुर्कीत बांधली लग्नगाठ

नुसरत आणि निखिल जैनने जून 2019 मध्ये तुर्कीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो कित्येक दिवस सोशल मीडियावर चर्चेत होते. लग्नानंतर दोघेही आपले रोमँटिक क्षण एकमेकांसोबत शेअर करायचे. आता गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधील मतभेद चर्चेत आले आहेत. निखिल यांनी नुसरतच्या गरोदरपणाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. असे म्हटले जात आहे की गेल्या 6 महिन्यांपासून दोघेही विभक्त राहत आहेत. याशिवाय नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ताच्या अफेअरच्या गोष्टीही समोर आल्या आहेत.

आम्ही केवळ व्यावसायिक मित्र!

मात्र, बंगाल निवडणुकीच्या वेळी यशने यावर स्पष्टीकरण दिले होते. नुसरतशी त्याचे केवळ व्यावसायिक संबंध असल्याचे त्याने म्हटले होते. दोघेही दोन वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक आहेत. नुसरत टीएमसी समर्थक आहे तर, यश भाजप समर्थक आहेत.

(Nusrat Jahan controversy Taslima Nasrin says Nusrat is pregnant and loves another man then she should divorce)

हेही वाचा :

Nusrat Jahan controversy: नुसरत जहांचं लग्न मोडलं, पतीवर गंभीर आरोप, 7 मोठ मोठे दावे, वाचा सविस्तर

खासदार-अभिनेत्री नुसरत जहां प्रेग्नंट? नवऱ्यापासून सहा महिने वेगळी राहत असल्याची चर्चा

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.