Nysa Devgan | न्यासा देवगणची तोडकी-मोडकी हिंदी ऐकून नेटकऱ्यांना हसू अनावर, पहा Video

'पू बनी पार्वती' असे कमेंट्स करत नेटकऱ्यांची तिच्या लूकची खिल्ली उडवली. मात्र यावेळी तिच्या लूकमध्ये न्यासाची हिंदी भाषा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये ती हिंदी बोलताना दिसतेय.

Nysa Devgan | न्यासा देवगणची तोडकी-मोडकी हिंदी ऐकून नेटकऱ्यांना हसू अनावर, पहा Video
Nysa DevgnImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 2:24 PM

मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासा देवगण नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. न्यासाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. मात्र इतर स्टारकिड्ससोबत ती नेहमी पार्ट्यांमध्ये ग्लॅमरस अंदाजात असते. न्यासाला अनेकदा तिच्या फॅशन सेन्सवरून आणि दिसण्यावरूनही ट्रोल केलंय. पार्ट्यांमध्ये बोल्ड कपड्यांमध्ये दिसणारी न्यासा अचानक नेटकऱ्यांना सलवार-सूटमध्ये पहायला मिळाली. त्यामुळे तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होणारच होता. ‘पू बनी पार्वती’ असे कमेंट्स करत नेटकऱ्यांची तिच्या लूकची खिल्ली उडवली. मात्र यावेळी तिच्या लूकमध्ये न्यासाची हिंदी भाषा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये ती हिंदी बोलताना दिसतेय.

एनवाय फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमात न्यासाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात लहान मुलांशी ती हिंदीत बोलली. माईकवर बोलताना ती अनेकदा अडखळते, तिला काही शब्द सुचत नाहीत. तिच्या याच तोडक्या-मोडक्या हिंदी भाषेला ऐकून नेटकऱ्यांना हसू अनावर होत आहे.

हे सुद्धा वाचा

न्यासाच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जेव्हा तुम्हाला अशा कार्यक्रमात बोलायला दिलं जातं, ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘लाजेखातर मला हसू अनावर होतंय’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलंय.

अजय देवगणची सोशल वर्क विंग एनवाय फाऊंडेशनच्या कार्यक्रमात न्यासाने भाग घेतला होता. यावेळी तिने डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन, पुस्तकांचं वितरण आणि विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट देण्याचं काम तिने केलं. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांशी तिने गप्पा मारल्या आणि त्यांना अभ्यासविषयक सल्लेसुद्धा दिले.

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील न्यासाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅक-टू-बॅक पार्ट्या केल्या होत्या. न्यू इअर पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नव्हता.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.