ज्या आजारामुळे बप्पी लाहिरींनी जीव गमावला त्याची लक्षणे माहितीय का?

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया या आजाराने प्रसिध्द गायक, संगीतकार असलेल्या बप्पी लाहिरी यांचा आज जीव घेतला. या आजाराचा संबंध आपल्या झोपेशी आहे. वेळीच या आजाराची लक्षणे ओळखली तर, यापासून आपले संरक्षण होण्यास मदत होते.

ज्या आजारामुळे बप्पी लाहिरींनी जीव गमावला त्याची लक्षणे माहितीय का?
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:48 PM

मुंबईः गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया’चा (Obstructive Sleep Apnea) त्रास होता. यातच त्याचे आज निधन झाले. अनेकांना या आजाराचे नावदेखील माहिती नसेल, परंतु कोणालाही हा आजार होऊ शकतो, काही कारणांमुळे त्याचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा सर्वाधिक धोका हा लठ्ठ लोकांना (Obesit) अधिक असतो. बप्पी लाहिरी गेल्या काही दिवसांपासून या आजाराने त्रस्त होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गेल्या एक वर्षांपासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया आणि छातीतील संसर्गाचा (Chest infections) त्रास होता. ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय याची माहिती ‘आज तक’ने प्रसिध्द केलेल्या एका वृत्तात देण्यात आली आहे.

रक्तात ऑक्सिजनची कमतरता

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया हा झोपेशी संबंधित आजार आहे. याला श्वासोच्छवासाचा विकारदेखील म्हणता येईल. यामुळे झोपताना श्वासोच्छ्वास अचानक थांबतो. या आजारात झोपेत व्यक्तीचा श्वासोच्छवास बंद होतो आणि त्याला ते कळतही नाही. झोपेत धाप लागण्याची समस्या काही सेकंदांपासून ते एक मिनिटापर्यंत असू शकते. अनेकदा तर झोपेतच व्यक्तीचे निधन होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या आजारामुळे रक्तात ऑक्सिजनची कमतरता होते आणि कार्बन डायऑक्साइड जमा होऊ लागतो. जेव्हा असे होते, तेव्हा संबंधित व्यक्तीला काही वेळासाठी जाग येते.

…तर होतो मृत्यू

श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे, व्यक्तीला बर्‍याच वेळा उठावे लागते. परंतु एक किंवा दोन वेळा दीर्घ श्वास घेतल्याने व्यक्तीला बरे वाटू लागते. या आजाराने त्रस्त लोकांनी रात्री किंवा तासाभरात अनेक वेळा दीर्घ श्‍वास घेण्याचा व्यायाम केला पाहिजे. या आजारने त्रस्त असलेल्यांना वारंवार झोप मोडल्यामुळे गाढ झोप लागत नाही. रात्री झोप लागत नसल्याने परिणामी दुपारी झोप किंवा आळस येत असतो. स्लीप एपनियाचे अनेक प्रकार आहेत, परंतु यापैकी सर्वात सामान्य म्हणजे स्लीप एपनिया. झोपेच्या वेळी घशाचे स्नायू सैल होतात तेव्हा हा त्रास जाणवत असतो. या आजारामुळे रुग्ण मोठ्याने घोरतो, परंतु घोरणारा प्रत्येक व्यक्ती या आजाराने ग्रस्त असेलच असे नाही. या आजारात श्वसनमार्गाच्या वरच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्याने हवेचा प्रवाह नीट वाहू शकत नाही. श्वासोच्छवासात दीर्घकाळ व्यत्यय आल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि रुग्णाचा मृत्यू होतो.

स्लीप एपनियाची लक्षणे

1) दिवसा खूप झोप येणे

2) मोठ्याने घोरणे

3) झोपताना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवणे

4) अचानक झोपेत जाग येणे

5) तोंड कोरडे पडणे किंवा घसा खवखवणे

6) सकाळी तीव्र डोकेदुखी होणे

7) लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे

8) निरुत्साह व नैराश्य वाटणे

9) उच्च रक्तदाब

10) लैंगिक इच्छा कमी होणे

स्लीप एपनियाची कारणे

लठ्ठपणा

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाने ग्रस्त बहुतेक लोकांचे वजन जास्त असते. श्‍वसननलिकेच्या वरच्या भागात चरबी जमा झाल्याने श्वास घेणे कठीण होते होत असते. हायपोथायरॉईड आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम यांसारख्या लठ्ठपणाशी संबंधित आजारांमुळेही हा आजार होऊ शकतो.

वयोवृध्दपणा

वयाच्या साठीनंतर स्लीप एपनिया होण्याची शक्यता वाढते, त्यातच लठ्ठपणा व वय जास्त असल्यास या आजाराची लक्षणे अधिक दिसून येतात.

अरुंद श्वसननलिका

श्वसननलिका लहानपणापासूनच अरुंद असेल. किंवा टॉन्सिल्स सुजल्यामुळे श्वसननलिकेच्या मार्गात श्‍वास घेताना अडथळा निर्माण झाल्यास या आजाराने समस्या निर्माण होत असते.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह

उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांमध्येही स्लीप एपनिया जास्त दिसून येतो. धूम्रपान करणाऱ्यांनाही स्लीप एपनियाचा धोका जास्त असतो. जर कुटुंबातील एखाद्याला याआधी स्लीप एपनिया झाला असेल, तर तुम्हालाही हा आजार होण्याची शक्यता असते. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना स्लीप एपनियाचा धोका जास्त असतो. या शिवाय दमा असलेल्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते.

स्लीप एपनियावर उपचार काय?

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियावर उपचार केला जाऊ शकतो. यामध्ये असे एक मशीन वापरले जाते जे रुग्ण झोपत असताना त्याचा श्‍वास घेण्याचा मार्ग मोकळा करते. उपचाराची आणखी एक पद्धत आहे ज्यामध्ये खालच्या जबड्यावर ‘माउथपीस’च्या माध्यमातून दाब टाकला जातो. त्यामुळे श्‍वासाचा मार्ग मोकळा होतो. काही प्रकरणांमध्ये, यासाठी शस्त्रक्रिया देखील आवश्यक आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामध्ये, पाठीवर झोपल्यावर व्यक्ती जास्त घोरतो तर एका बाजूने झोपल्यास घोरणे कमी होते. या आजाराची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. जेव्हा घोरण्याचा आवाज इतका मोठा होतो की त्यामुळे इतरांना त्रास होतो किंवा जेव्हा तुम्ही झोपेत असताना अचानक त्रास होउन तुमची झोप मोड होते तसेच श्‍वास घ्यायला त्रास होतो अशा वेळी तज़्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.

संबंधित बातम्या

झुंबा डान्स’चे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या

प्रथमच पालकत्व अनुभवताय? तुमच्या लहानग्यांसाठी ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.