जेव्हा सुशांत-अंकिताने एकत्र खेळली रंगपंचमी; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा रंगपंचमी खेळतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम करत असताना सुशांत-अंकिताच्या खास क्षणांचा हा व्हिडीओ आहे.

जेव्हा सुशांत-अंकिताने एकत्र खेळली रंगपंचमी; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
Sushant Singh Rajput and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 11:03 AM

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला रंगपंचमी खेळायला खूप आवडायचं. होळीनिमित्त त्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुशांत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे एकत्र रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. होळीच्या पार्टीतील हा व्हिडीओ असून त्यावेळी अंकिता आणि सुशांत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम करत होते. याच मालिकेच्या सेटदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जवळपास सात वर्षे अंकिता आणि सुशांतने एकमेकांना डेट केलं. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांनी विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती. त्यातल्यात होळी पार्टीतील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुशांत आणि अंकिता चाहत्यांसोबत धमाल करताना दिसून येत आहेत.

“जर तुमचा चेहरा रंगाने माखलेला नसेल, तर तुम्ही खरंच रंगपंचमी खेळली का? आम्ही रंगपंचमी खेळताना खास पांढरे कपडे घातले आहेत, जेणेकरून सर्व रंग दिसून येतील”, असं सुशांत या व्हिडीओमध्ये म्हणतोय. तर अंकिता म्हणते, “आम्ही रंगपंचमी खेळल्यानंतर तुम्ही आम्हाला ओळखूही शकणार नाही.” यावेळी अंकिता डान्ससुद्धा करून दाखवते आणि सुशांत ‘रंग बरसे’ या गाण्यातील अमिताभ बच्चन यांचे स्टेप्स करून दाखवतो. एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावताना दोघं ‘बुरा ना मानो होली है’ असंही म्हणताना दिसत आहेत. एका मुलाखतीत सुशांतने असंही म्हटलं होतं की त्याला अंकितापेक्षा जास्त रंगपंचमी खेळायला आवडते. “मी रंगपंचमी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने खेळतो. अगदी अंडी फोडण्यापासून ते माती अंगाला लावेपर्यंत आम्ही मित्र खूप धमाल करतो. अंकितालाही रंगपंचमी खेळायला आवडते. ती खूप उत्साही असते, पण रंगांपासून तीच आधी दूर पळते”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत आढळला होता. या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्रीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्याप कोणताच पुरावा सीबीआयच्या हाती लागला नाही. किंबहुना याप्रकरणी सीबीआयने अद्याप चार्जशीटसुद्धा दाखल केला नाही. त्यामुळे सुशांतला न्याय कधी मिळेल याची प्रतीक्षा अद्याप त्याचे असंख्य चाहते आणि कुटुंबीय करत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.