Om Raut | ‘रामायण’बद्दल ओम राऊत यांचा अत्यंत मोठा दावा, ‘आदिपुरुष’च्या वादावर केला खुलासा, थेट म्हणाले, हे फक्त मुर्खच करतात
आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठा वाद हा सातत्याने बघायला मिळतोय. आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात लोकांचा संताप वाढताना दिसतोय. आता अखेर यावर ओम राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. यामध्ये ओम राऊत यांनी काही मोठे खुलासे केल्याचे देखील बघायला मिळत आहे.
मुंबई : सध्या सर्वत्र फक्त एकाच चित्रपटाची चर्चा प्रचंड बघायला मिळत आहे ते म्हणजे आदिपुरुषची. आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट तूफान चर्चेत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपला मोर्चा वळवत चित्रपटावर टीका करण्यास सुरूवात केलीये. दुसरीकडे लोक सतत चित्रपटावर (Movie) बंदी घालण्याची मागणी करत आहेत. रामायण अत्यंत चुकीच्या पध्दतीने चित्रपटात दाखवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. फक्त रामायणच नाही तर चित्रपटातील अनेक डायलॉग्सवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. आदिपुरुष चित्रपटातून हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याचे सांगितले जात आहे. मुळात म्हणजे आदिपुरुष हा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. ओम राऊत (Om Raut) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय.
आदिपुरुष चित्रपटाच्या विरोधात लोकांचा वाढता संताप बघता काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय शेवटी चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. सतत आदिपुरुष चित्रपटाचा वाद वाढत असतानाच निर्मात्यांनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी चित्रपटाने जबरदस्त अशी कामगिरी ही नक्कीच केलीये. दुसऱ्या दिवशी मात्र, लोकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.
आदिपुरुष हा चित्रपट अत्यंत बिग बजेट चित्रपट आहे. पहिल्या दिवशी जगभरातून चित्रपटाने 140 कोटींची कमाई केल्याचा दावा निर्मात्यांकडून केला जात आहे. मोठा वाद सुरू असतानाच आता ओम राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाबद्दल येत असलेल्या नकारात्मक गोष्टींवर ओम राऊत यांनी भाष्य केले आहे. एक प्रकारे त्यांनी लोकांना जोरदार प्रतिउत्तरच दिले आहे.
ओम राऊत म्हणाले की, ज्या पध्दतीने चित्रपट सुरू असताना थिएटरमध्ये ‘जय श्री राम’ च्या घोषणा या दिल्या जात आहेत, त्यावर मी खूप जास्त खुश आहे. चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ही एक मोठा पावती नक्कीच आहे. सर्वात महत्वाचे हे आहे की, बाॅक्स आॅफिसवर लोकांचा कसा प्रतिसाद चित्रपटाला मिळत आहे. मी खरोखरच आनंदी आहे, कारण चित्रपट धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर करत आहे.
पुढे ओम राऊत म्हणाले, रामायण पुर्णपणे समजल्याचा दावा करणे मुळात चुकीचे आहे ते फक्त मुर्खच करतात. जर मी तुम्हाला सांगितले की मला रामायण समजले आहे, तर ती एक गंभीर चूक असेल, कारण मला वाटते की रामायण समजून घेण्याची क्षमता कोणाचीच नाहीये. मला स्वत:ला जे काही रामायण समजले आहे आणि जे काही तुम्हाला माहीत आहे ते एखाद्या गिलहरीच्या योगदानासारखे आहे. मला रामायणाबद्दल जे काही समजले आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.