OMG 2 Trailer : अक्षय कुमारच्या OMG 2 चा ट्रेलर रिलीज, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) मोस्ट अवेटेड चित्रपट असलेल्या OMG 2 अर्थात ‘ओह माय गॉड 2’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 ऑगस्ट रोजी हा ट्रेलर प्रदर्शित होणार होता, मात्र विख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या निधनानंतर मेकर्सनी ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अखेर आज सकाळी हा ट्रेलर रिलीज झाला आहे.
या चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून बराच वाद सुरू होता. सेंसॉर बोर्डाने चित्रपटात अनेक बदल केले आहेत. त्यानंतर चित्रपटात अक्षय कुमार भगवान शंकराच्या नव्हे तर त्याच्या दूताच्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
OMG 2 चा ट्रेलर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘शुरू करो स्वागत की तैयारी ११ अगस्त को आ रहे हैं डमरूधारी’ अशी कॅप्शन लिहीत त्याने ट्रेलरची पोस्ट शे्कर केली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच पंकज त्रिपाठी, यामी गौतम, आणि अरुण गोविल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. मात्र या चित्रपटाची कथी पहिल्या चित्रपटापेक्षा संपूर्ण वेगळी असल्याचं समजतंय.
View this post on Instagram
OMG 2 ला मिळाले A सर्टिफिकेट
OMG 2 मध्ये अक्षय कुमारला भगवान शंकराच्या रूपात दाखवण्यावरून बराच वाद झाला होता. निर्मात्यांनी चित्रपटातील सीन्समध्ये बदल केले आहेत. त्यामुळे या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ‘A’ सर्टिफिकेट मिळाले आहे.
View this post on Instagram
गदर 2 सोबत होणार OMG 2 ची टक्कर
अक्षय कुमाराचा OMG 2 पुढल्या आठवड्यात अर्थात 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी सनी देओलचा बहुचर्चित गदर 2 हा चित्रपटही रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.