OMG 2 | भगवान शंकर सावरणार अक्षयचं करिअर?, ‘ओह माय गॉड 2’ स्क्रिनिंगदरम्यान ‘हर हर महादेव’च्या घोषणा

सनी देओलच्या 'गदर 2'च्या तुलनेत 'OMG 2'ची ॲडव्हान्स बुकिंग फारशी झाली नव्हती. त्यामुळे ओपनिंग कमाईवर थोडासा फटका बसू शकतो. मात्र ट्विटरवर सकारात्मक पब्लिसिटी होत असल्याने पहिल्या वीकेंडपर्यंत कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

OMG 2 | भगवान शंकर सावरणार अक्षयचं करिअर?, 'ओह माय गॉड 2' स्क्रिनिंगदरम्यान 'हर हर महादेव'च्या घोषणा
OMG 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 12:08 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सेक्स एज्युकेशनच्या विषयामुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र दिलं. तर काही सीन्ससुद्धा बदलण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी चित्रपटाभोवती काहीसं नकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाशी टक्कर असतानाही अक्षयच्या ‘OMG 2’बद्दल प्रेक्षकांमध्ये हळूहळू वातावरणनिर्मिती होत आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी या जोडीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

या चित्रपटाचा प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने पाचपैकी चार स्टार दिले आहेत. चित्रपटाची कथा आणि कलाकारांचं अभिनय हे या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. उत्तम स्क्रीनप्ले सोबतच दमदार डायलॉग्समुळे थिएटरमध्ये शिट्ट्या वाजवल्या जात आहेत आणि टाळ्यांचा कडकडाट होत आहे. इतकंच नव्हे तर अक्षयच्या एण्ट्रीवर ‘हर हरम महादेव’च्या घोषणाही होत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘भगवान शंकराच्या भूमिकेतील अक्षय कुमारने दमदार कामगिरी केली’, असं एकाने लिहिलं. तर ‘काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याचा निर्णय प्रेक्षकांकडे सोपवावा. प्रेक्षकांची प्रतिक्रियाच समोर येत आहे. चांगल्या मुद्द्यावर हा चित्रपट बनवला आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर भरभरून व्यक्त होत आहेत. गेल्या काही काळातील हा अक्षयचा सर्वोत्तम चित्रपट असल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

सनी देओलच्या ‘गदर 2’च्या तुलनेत ‘OMG 2’ची ॲडव्हान्स बुकिंग फारशी झाली नव्हती. त्यामुळे ओपनिंग कमाईवर थोडासा फटका बसू शकतो. मात्र ट्विटरवर सकारात्मक पब्लिसिटी होत असल्याने पहिल्या वीकेंडपर्यंत कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर असल्याने यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा 2012 मध्ये ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला त्यातील काही धार्मिक गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला, मात्र कथेतील तर्कवितर्क पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दर्शवली. आता याच चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी यांची जोडी पहायला मिळतेय. ‘OMG’च्या लोकप्रियतेला टक्कर देऊन ‘OMG 2’ हा चित्रपटसुद्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकेल का, असं मोठं आव्हान निर्मात्यांसमोर आहे. मात्र माऊथ पब्लिसिटी पाहता हे आव्हान निर्माते सहज पेलू शकतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.