Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | मासे-मटणावर ताव मारायचा अक्षय कुमार; अचानक का सोडला मांसाहार?

'त्या' एका घटनेनंतर अक्षय कुमार याने सोडला मांसाहार.. त्यानंतर अभिनेत्याला मासे-मटणावर ताव मारायची इच्छाच झाली नाही... नक्की काय आहे यामागचं कारण?

Akshay Kumar | मासे-मटणावर ताव मारायचा अक्षय कुमार; अचानक का सोडला मांसाहार?
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 10:43 AM

मुंबई | बॉलिवूडमधील सेलब्रिटी कायम त्यांच्या फिटनेस आणि डाएटमुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर सेलिब्रिटी ते घेत असलेल्या आहाराबद्दल देखील चाहत्यांना  सांगतात. पण काही सेलिब्रिटींना मात्र मांसाहार करायला प्रचंड आवडतं. एक काळ असा होता जेव्हा अभिनेता अक्षय कुमार मासे-मटणावर ताव मारायचा. पण आता खिलाडी कुमारने मांसाहार सोडून दिला आहे. यामागे देखील मोठं कारण आहे. आयुष्यात आलेल्या एका प्रसंगानंतर अभिनेत्याने मांसाहार करण सोडून दिलं. मांसाहार करु नकोस असा सल्ला अक्षय कुमार याला त्याच्या आईने दिला होता. अभिनेत्याने आईच्या सल्ल्यानुसार मांसाहार करणं सोडून दिलं.

सांगायचं झालं तर, अक्षय कोणत्या सिनेमात कोणती भूमिका साकारणार आहे याबद्दल सर्व माहिती अभिनेत्याच्या आईला असायची. एवढंच नाही तर अक्षयच्या आई अरुणा मुलाला अनेक महत्त्वपूर्ण सल्ले देखील द्यायच्या. जेव्हा अरुणा यांना कळलं की, ‘ओ माय गॉड’ सिनेमात अक्षय कृष्णाची भूमिका साकारणार आहे. तेव्हा त्यांनी मुलाला मांसाहार करु नकोस असा सल्ला दिला होता.

रिपोर्टनुसार, अरुणा मुलाला म्हणाल्या, ‘सिनेमाचं शुटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार करु नकोस. कारण तू देवाच्या भूमिकेत दिसणार आहेस…’ आईने दिलेला सल्ला अक्षय याला आवडला आणि त्याने ‘ओ माय गॉड’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत मासे – मटण न खाण्याचा निर्णय घेतला.

अखेर ‘ओ माय गॉड’ सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालं. सिनेमा प्रदर्शित झाला पण अक्षय याने मासे – मटणाचा त्याग केला. मांसाहार करणं सोडल्यानंतर ते पुन्हा खाण्याची अक्षय याची इच्छाच झाली नाही. अक्षय कुमार याने ‘ओ माय गॉड’ सिनेमानंतर मांसाहार करणं सोडून दिलं.

अभिनेत्याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अक्षय लवकरच ‘ओ माय गॉड २’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. मंगळवारी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या टीझरने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सध्या सर्वत्र खिलाडी कुमार याच्या ‘ओ माय गॉड २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओह माय गॉड ’ सिनेमा नास्तिक कांजीलाल मेहता याच्या कथे भोवती फिरत होता. पण सिनेमाच्या सिक्वलमध्ये पंकज त्रिपाठी यांची शंकरावर असलेली निस्सिम भक्ती दिसून येत आहेत. पंकज त्रिपाठी सिनेमात कान्ती शरण मुदगल ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे.

दिग्दर्शक अमित राय दिग्दर्शित ‘ओह माय गॉड 2’ सिनेमा १ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.