Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’मध्ये पहिल्याच दिवशी घमासान, थेट स्पर्धेकांमध्ये धक्काबुक्की
बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 चा नुकताच आता प्रिमियर पार पडलाय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. बिग बॉस 17 ला सलमान खान हाच होस्ट करताना दिसणार आहे.
मुंबई : बिग बॉस सीजन 17 ला नुकताच सुरूवात झालीये. बिग बॉस सीजन 17 (Bigg Boss Season 17) ची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसले. नुकताच बिग बॉस (Bigg Boss) सीजन 17 चा प्रिमियर पार पडलाय. विशेष म्हणजे सलमान खान हा या प्रिमियरमध्ये धमाका करताना दिसला. सलमान खान (Salman Khan) याने अत्यंत जबरदस्त असा डान्स केला. बिग बॉस 17 मध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले. इतकेच नाही तर थेट सलमान खान याच्यासमोर मंचावर काहीजण भांडणे करताना देखील दिसले.
बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालीये. विशेष म्हणजे यावेळी जबरदस्त असा डान्स करताना देखील अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दिसले. यासोबतच ऐश्वर्या शर्मा आणि निक भट्ट हे देखील बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाले. यांनी देखील बिग बॉस 17 च्या मंचवर धमाकेदार डान्स केला.
बिग बॉस 17 चा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य जोरदार भांडणे करताना दिसत आहेत. फक्त भांडणेच नाही तर चक्क एकमेकांच्या अंगावर जाताना देखील हे दिसत आहेत. बिग बॉस 17 ला सुरू होऊन एक दिवस पूर्ण झालेल्या नसताना अशाप्रकारे घरातील सदस्य भांडत असल्याने सर्वांनाच धक्का बसलाय.
View this post on Instagram
या सीजनमध्ये मोठे वाद बघायला मिळणार हे स्पष्टच आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिषेक कुमार ‘तहलका भाई’ उर्फ सनी आर्या हे एकमेकांना धक्के देत आहेत. फक्त हेच नाही तर अभिषेक हा देखील काही सदस्यांसोबत भांडणे करताना दिसतोय. यावेळी थेट एकजण या भांडणामध्ये खाली पडल्याचे देखील दिसतंय.
हा व्हिडीओ पाहून लोक मोठ्या प्रमाणात हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 कडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. बिग बॉस 16 सुपरहिट ठरले. यामुळेच निर्मात्यांनी हे देखील सीजन हिट करण्यासाठी कंबर कसल्याचे स्पष्ट दिसतंय. बिग बॉस 17 मध्ये यावेळी जवळपास प्रत्येक क्षेत्रातील लोक सहभागी झाले आहेत. यामुळेच मोठा धमाका होणार हे जवळपास स्पष्ट आहे.