रेखा याचं खळबळजनक वक्तव्य, ‘मी अपवित्र आणि वासनेच्या आहारी…’
Rekha: 'मी अपवित्र आणि वासनेच्या आहारी...', रेखा यांच्या अशा वक्तव्यानंतर माजली होती सर्वत्र खळबळ, असं का म्हणाल्या होत्या रेखा? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांच्या वक्तव्याची चर्चा...
बॉलिवूडच्या दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. रेखा यांचं नाव अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. रेखा यांच्या आयुष्यातील अनेक असे किस्से आहेत, जे वादाच्या भोवऱ्यात राहिले. ज्यावर खुद्द रेखा यांनी मोठा खुलासा केला.
अनेक मुलाखतींमध्ये रेखा यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या अनेक वर्षांनंतर देखील चर्चेत राहातात. एका मुलाखतीत तर रेखा यांनी स्वतःला ‘मी वासनेच्या आहारी गेली आहे…’ असं वक्तव्य केलं होतं.
एका मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या दारू आणि ड्रग्स सेवनाबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा रेखा यांनी नशा करत असल्याचं कबुल केलं होतं. मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, ‘मी अपवित्र आणि वासनेच्या आहारी गेलेली आहे. आता मला विचारू नका कोणासोबत? स्वतःच्या आयुष्यासोबत…’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.
रेखा यांचं लग्नाबद्दल वक्तव्य
पहिल्या पतीच्या निधनानंतर रेखा यांना एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा रेखा यांनी उटल प्रश्न विचारला, ‘पुरुषासोबत? मी एक महिलेसोबत लग्न नाही करू शकत?’ रेखा यांचं असं उत्तर ऐकल्यानंतर समोर बसलेली व्यक्ती देखील हैराण झाली.
रेखा पुढे म्हणाल्या, ‘मी माझ्या मनासोबत… माझ्या कामासोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत लग्न केलं आहे…’ असं देखील रेखा मुलाखतीत म्हणाल्या होत्या. रेखा यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत रेखा यांनी लग्न केलं होतं.
रेखा – मुकेश यांनी लग्न तर केलं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधीच मुकेश यांनी स्वतःला संपवलं… पहिल्या पतीचं निधन झाल्यानंतर रेखा यांना टीकेचा सामना करावा लागला. तर त्यानंतर रेखा यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार देखील केला नाही. आज रेखा यांच्या पैसा, प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही असलं तरी एकट्याच जगत आहेत.