Shah Rukh khan | ‘वय झालय असं करु नका’, किंग खानच्या एका सवयीची मुलांना होते अडचण

Shah Rukh khan | शाहरुख खान याची एक सवय पत्नी आणि मुलांना बिलकूल आवडत नाही... खुद्द किंग खान याने केलाय मोठा खुलासा... अभिनेत्याची मोठी गोष्ट अखेर समोर

Shah Rukh khan | 'वय झालय असं करु नका', किंग खानच्या एका सवयीची मुलांना होते अडचण
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 11:07 AM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh khan) याने त्याच्या अभिनय क्षेत्रात अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक अभिनेत्री आणि महिला चाहत्या किंग खान याच्यावर फिदा आहेत. पण शाहरुख खान याच्या मनावर फक्त अभिनेत्याच्या पत्नीचं राज्य आहे. शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने कधीही अभिनेत्याची साथ सोडली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून किंग खान आणि गौरी खान एकत्र आहे. पण शाहरुख खान याची एक सवय आहे, जी अभिनेत्याच्या पत्नीला आणि मुलांना बिलकूल आवडत नाही. खुद्द अभिनेत्याने यावर मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे शाहरुख खान चर्चेत आला आहे.

बॉलिवूडमध्ये शाहरुख खान याची ओळख रोमान्सचा बादशहा अशी आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्याचा रोमाँटिक अंदाज प्रचंड आवडतो. पण शाहरुख खान याच्या कुटुंबियांना बिलकूल त्याच्या रोमाँटिक अंदाजाची सवय आवडत नाही. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्याने यावर मोठा खुलासा केला आहे…

अभिनेता म्हणाला, ‘मी जेव्हा पाच वर्षांचा होतो, तेव्हा घराच्या खिडकीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींना फ्लाइंग किस करायचो. तेव्हा मी लहान होतो. पण एका मुलीने माझ्या वडिलांकडे माझी तक्रार केली होती. तुमचा मुलगा मला बघून शिट्ट्या मारतो, ताळ्या वाजतो… वडिलांनी मला बोलावलं. तेव्हा त्या मुलीला पाहिलं आणि म्हणालो स्‍वीटहार्ट…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘माझी ही सवय आजही बदलेली नाही. त्यामुळे माझी पत्नी नाराज होते. शिवाय माझा रोमाँटिक अंदाज पाहून मुलं मला म्हणतात, ‘वय झालय असं आता करु नका’ पण मी त्यांना म्हणतो मी आजही जवान आहे…’ सध्या सर्वत्र शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगत आहे.

शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला

यंदाच्या वर्षी किंग खान याने चार वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘पठाण’ सिनेमानंतर अभिनेत्याचा ‘जवान’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने तीन दिवसांत २०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशात आज रविवार असल्यामुळे ‘जवान’ किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.