‘या’ पाच गाण्यांनी ज्ञानेश पुणेकर घराघरात पोहोचले, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

प्रसिद्ध गीतकार ज्ञानेश पुणेकरांनी आंबेडकरी गीते, चित्रपट गीते, लोकगीते आणि अनेक पोवाडे लिहिले. त्यांची अनेक गीते गाजली. (one incident changed a life of dnyanesh punekar, read story)

'या' पाच गाण्यांनी ज्ञानेश पुणेकर घराघरात पोहोचले, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!
dnyanesh punekar
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 6:55 PM

मुंबई: प्रसिद्ध गीतकार ज्ञानेश पुणेकरांनी आंबेडकरी गीते, चित्रपट गीते, लोकगीते आणि अनेक पोवाडे लिहिले. त्यांची अनेक गीते गाजली. परंतु, त्यांची आंबेडकरी गीते सर्वाधिक गाजली. कोणतीही होती ही गीते? वाचा या गीतांचा किस्सा. (one incident changed a life of dnyanesh punekar, read story)

अन् टर्निंग पॉईंट मिळाला

ज्ञानेश पुणेकर यांना शालेय जीवनापासूनच गाण्याची, कव्वालीची पुस्तके वाचण्याचा छंद जडला होता. पण त्यांच्या आयुष्याला खरा टर्निंग पॉईंट मिळाला तो 1964 मध्ये. 1964मध्ये कुर्ला पाईपलाईन रोडवर प्रसिद्ध गायकल कृष्णा शिंदे आणि गोविंद म्हशीलकर यांचा सामना होता. पुणेकरांनी आयुष्यातील हा पहिला सामना ऐकला. हा सामना म्हणजे केवळ आंबेडकरी विचारांचा उत्सव होता. तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य होतं. दोन्ही कव्वाली सम्राटांची शब्दांवरील हुकूमत आणि विचारांची बांधिलकी पाहून पुणेकरांमधील कवी जागा झाला आणि ते लिहिते झाले. आच काळात त्यांची ओळख शीघ्र कवी ल. मा. पगारे यांच्याशी झाली. ओळखीचं रुपांत मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांतर गुरु-शिष्याच्या नात्यात झालं. गुरुच्या नात्याने पगारे यांनीही पुणेकरांना गाण्याची बाराखडी शिकवली. यमकापासून ते गाण्याचा आशय आणि बांधणी याबाबतचं मार्गदर्शन त्यांनी पुणेकरांना केलं. त्यामुळे पुणेकर कवी म्हणून घडले. तर, गोविंद म्हशीलकरांनी सिनेमात गीतं लिहिण्याची संधी दिल्याने ते सिनेगीतकार म्हणूनही उदयास आले.

म्हशीलकर म्हणाले, वाह क्या बात है

त्याकाळी कुलाबा येथे गोविंद म्हशीलकर आणि काशिनाथ शितोळे यांचा सामना होता. यावेळी पगारे यांच्या आज्ञेवरून पुणेकरांनी शितोळे यांना गाणी पुरवण्याचं काम केलं. कवी राजानंद गडपायले यांचं त्याकाळात गाजलेलं एक गीत होतं. हे गीत म्हशीलकर प्रत्येक कार्यक्रमात म्हणायचे. या गीताला कोणीही कापत नसे.

दिल्लीच्या तख्तास भुलवी सर्वांगी देखणी, माझ्या बाबांची बाबांची लेखणी….

हेच ते गाणं. म्हशीलकरांनी हे गाणं या सामन्यात म्हटलं. त्याला पुणेकरांनी उत्तर दिलं. आणि शितोळेंनी पुणेकरांनी उत्तरा दाखल लिहिलेलं गाणं गायलं.

मनाला रिजवून तणाला झिजवून, कर आधी आखणी, कर भोवताली लेखणीची राखणी…

पुणेकरांनी लिहिलेलं आणि शितोळेंनी गायलेल्या या गाण्याला रसिकांनी प्रचडं प्रतिसाद दिली. स्वत: म्हशीलकरांनीही या गाण्याला वाह क्या बात है म्हणत दाद दिली. त्यानंतर म्हशीलकरांनी सकाळी उठल्या बरोबर शितोळेंना गाठलं. रात्री माझं गाणं कापलं तो कवी कोण आहे? कुठे आहे तो कवी? असा प्रश्न म्हशीलकरांनी केला. त्यावर शितोळेंनी पुणेकरांकडे बोट दाखवत हेच माझे ज्ञानोबा असं म्हटलं. त्यावर तुमचा ज्ञानोबा आजपासून माझा कवी, असं म्हशीलकरांनी तिथेच जाहीर केलं. ही आठवण सांगतनाच पुणेकर भावूक होतात. गीतकार म्हणून जडणघडण करण्यात अनेकांनी मदत केली. पण ल. मा. पगारे हेच माझे खरे गुरु आहेत. त्यांना मी आयुष्यभर विसरणार नाही, असं ते सांगतात.

पुणेकरांची गाजलेली गाणी…

पंचशीला त्रिसरण ही तत्वे दिधलीया बहुजना, बुद्धं शरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं शरणं म्हणा म्हणा रे…

आणि

क्रांतीवीर महापुरुष जन्मा आले धरतीवरं भीमराव आंबेडकरं, धन्य ते भीमराव आंबेडकरं…

आणि

राजगृहाचा जीना मी चढून आलो, बाबांची काठी, खुर्ची पाहून रडून आलो, स्पर्श झाला, झाला ज्या मातीला बाबासाहेबांचा, ती माती मी पाहून आलो, परतुनी आता येणार नाही, बाबासाहेब पुन्हा बोलला राजगृहाचा जिना…

आणि

आनंदाच्या सोहळ्यात जणू नवरी नटली भीम बुद्धाच्या परीस आहे का जयंती कुठली? (साभार, आंबेडकरी कलावंत) (one incident changed a life of dnyanesh punekar, read story)

संबंधित बातम्या:

लिहीत राहा, प्रगती करा, साक्षात निळूभाऊंकडून कौतुक; वाचा, कोण आहेत ज्ञानेश पुणेकर

विद्यार्थीदशेतच तबला वाजवण्याचा छंद जडला, वर्गातही बाकं वाजवायचे; वाचा, दत्ता शिंदेंचे किस्से

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडून कौतुक, सोबत काम करण्याचीही ऑफर; जाणून घ्या ‘या’ गायकाचा किस्सा!

(one incident changed a life of dnyanesh punekar, read story)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.