Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णा अभिषेकनंतर आता ‘या’ कॉमेडियनने सोडला ‘द कपिल शर्मा शो’; कशावरून झाला वाद?

हा शो सोडणारा सिद्धार्थ काही पहिलाच कलाकार नाही. याआधी भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंग, चंदन प्रभाकर यांसारख्या कलाकारांनी विविध कारणांमुळे द कपिल शर्मा शो सोडला आहे.

कृष्णा अभिषेकनंतर आता 'या' कॉमेडियनने सोडला 'द कपिल शर्मा शो'; कशावरून झाला वाद?
Kapil SharmaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 1:24 PM

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ने गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आतापर्यंत चंदन प्रभाकर आणि कृष्णा अभिषेक यांसारख्या कॉमेडियन्सनी हा शो सोडला आहे. त्यात आता आणखी एका कॉमेडियनची भर पडली आहे. कृष्णा आणि चंदननंतर कॉमेडियन सिद्धार्थ सागरनेही हा शो सोडल्याचं कळतंय. द कपिल शर्मा शोच्या नव्या सिझनमध्ये बऱ्याच नव्या कलाकारांची एण्ट्री झाली. त्यात सिद्धार्थ सागरचाही समावेश होता.

सिद्धार्थने या शोमध्ये कधी ‘सेल्फी मौसी’ तर कधी ‘उस्ताद घरचोरदास’ अशा भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता त्यानेही द कपिल शर्मा शोला रामराम केल्याचं कळतंय. यामागचं कारण म्हणजे सिद्धार्थची फी. सिद्धार्थला त्याचं मानधन वाढवून पाहिजे होतं. मात्र निर्मात्यांनी त्याला नकार दिला. म्हणूनच त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

हे सुद्धा वाचा

द कपिल शर्मा शोकडून ऑफर मिळाल्यानंतर सिद्धार्थ दिल्लीहून मुंबईला राहायला आला. आता शो सोडल्यामुळे तो पुन्हा दिल्लीला परतला आहे. याप्रकरणी त्याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने साफ नकार दिला.

हा शो सोडणारा सिद्धार्थ काही पहिलाच कलाकार नाही. याआधी भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंग, चंदन प्रभाकर यांसारख्या कलाकारांनी विविध कारणांमुळे द कपिल शर्मा शो सोडला आहे.

सुनील ग्रोवर आणि कपिल शर्माचा वाद जगजाहीर आहे. या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर सुनीलने हा शो सोडला होता. त्यानंतर अली असगर, उपासना, चंदन प्रभाकर यांनीसुद्धा या शोला रामराम केला. आता सिद्धार्थच्या जागी या कॉमेडी शोमध्ये कोणता कलाकार येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

कॉमेडियन कृष्णा अभिषेकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतंं की त्याचा कपिल शर्माशी कोणताही वाद नाही. जर पुन्हा संधी मिळाली तर तो त्याच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे सिद्धार्थ गेल्यानंतर त्याची जागा कृष्णा अभिषेक घेणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.