फक्त पेटीएम नाही तर, ‘या’ ॲप्सवरुन करा सिनेमाचं तिकिट बूक; होईल मोठा फायदा
'गदर २', 'OMG 2' सिनेमाचं तिकिट बूक करत आसला तर 'या' ॲप्सवरुन करा, होईल फायदा... सध्या सर्वत्र ऑनलाईन तिकिट बुकिंगची चर्चा...
मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित झाला. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे चाहते सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. रविवार असल्यामुळे अनेक जण मित्र आणि कुटुंबासोबत सिनेमा पाहण्याची योजना आखत आहेत. अनेक प्रेक्षक सिनेमाचं तिकिट चित्रपटगृहाबाहेरुन खरेदी करतात, तर काही मात्र ऑनलाईन तिकिट बूक करतात. तुम्ही देखील ऑनलाईल तिकिट बूक करत असाल तर, ‘या’ ॲप्सवरुन सिनेमाचं तिकिट बूक करा. ज्यामुळे तुम्हाला देखील फायदा होईल.
बूक माय शो या ॲपच्या माध्यमातून कोणत्याही सिनेमाचं तिकिट बूक करणं फार सोपं आहे. बूक माय शो हा ॲप गूगल प्ले स्टोर आणि ॲपल ॲप स्टोर दोघांमध्ये उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडीच्या सिनेमाचं तिकिट बूक करू शकता.
बूक माय शो शिवाय तुम्ही TicketNew या ॲपचा देखील वापर करु शकता. हे ॲप आतापर्यंत ५ मिलिनयपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलं आहे. ॲपला गूगल प्ले स्टोरवर ३.८ रेटिंग मिळाली आहे. या ॲपचा वापर करुन देखील तुम्ही सिनेमाचं तिकिट बूक करु शकता.
INOX या ॲपवरुन देखील तुम्ही कोणत्याही सिनेमाचं तिकिट बूक करू शकता. गूगल प्ले स्टोरवर या ॲपला ३.९ रेटिंग मिळाली आहे. १० लाख पेक्षा अधिक युजर्सने ॲप स्वतःच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं आहे. हे ॲप तुम्ही मोफत डाऊनलोड करु शकता.
PVR Cinema या ॲपवरुन देखील तुम्ही कोणत्याही सिनेमाचं तिकिट बूक करू शकता. गूगल प्ले स्टोरवर या ॲपला ३.९ रेटिंग मिळाली आहे. तुम्ही या ॲपवर पहिल्यांदा साईन अप करत असाल तर तुम्हाला १०० रुपयांचं कॅशबॅक मिळेल.
अनेक जण सिनेमाचं तिकिट बूक करण्यासाठी PayTm चा वापर करतात.. या ॲपवरुन तुम्ही सिनेमाचं तिकिट बूक करत असाल तर तुम्हाला अनेक ऑफर्स मिळू शकतात. या ॲपवरुन सिनेमाचं तिकिट बूक करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्याव लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही सिनेमाचं तिकिट बूक करु शकतात.