कंगनाला तिच्या विजयावर फक्त एकाच सेलिब्रिटीने दिल्या शुभेच्छा, बॉलिवूड गप्प का?
कंगना रणौतने लोकसभा निवडणुकीत मंडी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. मंडीतील लोकांची सेवा करण्याची आपली वचनबद्धता तिने व्यक्त केली. मंडी सोडून मुंबईला जाण्याचा तिचा कोणताही हेतू नाही. कंगनाला तिच्या या विजयावर एकाच सेलिब्रिटीने शुभेच्छा दिल्या आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. यावेळी अनेक धक्कादायक निकाला लागले आहेत. अनेक जागांवर मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यावेळी बॉलिवूड, भोजपुरी आणि साऊथ इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी देखील निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावले होते. त्यापैकी काही सेलिब्रिटींना यश मिळाले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी विजय मिळवलाय. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अरुण गोविल आणि कंगना राणौत यांनी निवडणुकीत विजय मिळवलाय. तर साऊथ इंडस्ट्रीमधून पवन कल्याण आणि सुरेश गोपी या दिग्गज कलाकारांनी मोठा विजय मिळवलाय. भोजपुरी इंडस्ट्रीतील मनोज तिवारी आणि रवी किशन यांनीही निवडणुकीत बाजी मारलीये.
पवन कल्याण यांना विजयाच्या शुभेच्छा
साऊथ इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनी पवन कल्याण यांना त्याच्या विजयाबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु बॉलिवूडमधील केवळ एका व्यक्तीने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे हिचे तिच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यामुळे कंगना राणौतच्या या विजयाने बॉलिवूड इंडस्ट्री खूश नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जनता सेना पक्षाचे संस्थापक अभिनेता पवन कल्याण यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातील पिथापुरम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पवन कल्याण हे वायएसआरसीपी (युवज्ञा श्रमिका रुथी काँग्रेस पार्टी) च्या वनगा गीता विश्वनाथम यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. त्यांनी 70,000 हून अधिक मतांच्या फरकाने सहज विजय मिळवला.
सोशल मीडियावर अभिनंदन
पवन कल्याणच्या विजयावर अनेक साऊथच्या इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीही आनंद व्यक्त केला आहे. राम चरण, अल्लू अर्जुन, धरम तेज, आदिवासी शेष, नितीन, वरुण कोनिडेला, नानी आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पवन कल्याणचे मनापासून अभिनंदन केले आहे.
कंगना राणौत मंडी मतदारसंघातून विजयी
अभिनेत्री कंगना राणौत हिला फक्त बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. इतर कोणीही तिला अभिनंदनाचा संदेश दिलेला नाही. कंगना राणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. कंगना राणौतने काँग्रेस पक्षाच्या विक्रमादित्य सिंह यांचा ७४,७५५ मतांनी विजय पराभव केला आहे.
बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी अभिनेत्री कंगना राणौतचे अभिनंदन करत लिहिले की- प्रिय कंगना, शानदार विजयासाठी अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस. तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हिमाचल प्रदेश आणि मंडीतील लोक तुझ्यासाठी आनंदी आहेत. मेहनत केली तर काहीही शक्य आहे हे तु सिद्ध केले. विजयी हो.
अभिनेता पवन कल्याणच्या विजयावर साऊथ इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याचे अभिनंदन केले पण कंगनाला कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कंगनाला तिच्या विजयाबद्दल बॉलिवूडमधून अभिनंदन न मिळण्याचे कारण तिचे इंडस्ट्रीविरुद्ध बोलणे असू शकते. अभिनेत्रीने अनेकदा इंडस्ट्रीमधील घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले आहे. अनेक अभिनेत्यांची तिने खरडपट्टी काढली आहे. करण जोहरसोबत तिचा 36 चा आकडा आहे. त्यामुळे तिला इंडस्ट्रीतून बहिष्कार देखील केले गेले आहे. कंगनाच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने बी-टाऊनमध्ये काहीही फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे.