माझ्या आयुष्यात एकच दिशा…, टायगल श्रॉफ – दिशा पाटनी पुन्हा आलेत एकत्र, मिटले वाद?

Tiger Shroff love life | अनेक वर्षांनंतर दिशा पाटनी - टायगर श्रॉफ पुन्हा आलेत एकत्र? अभिनेता म्हणाला, 'माझ्या आयुष्यात एकच दिशा…', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा - टायगर यांच्या रिलेशनशिपची चर्चा... काय आहे नक्की सत्य... चाहत्यांच्या मनात उपस्थित झालेत अनेक प्रश्न...

माझ्या आयुष्यात एकच दिशा…, टायगल श्रॉफ - दिशा पाटनी पुन्हा आलेत एकत्र, मिटले वाद?
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 4:10 PM

अभिनेता टायगर श्रॉफ याचे गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टायगर याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार देखील तुफान चर्चेत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे. टायगर आणि अक्षय ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ सिनेमामुळे चर्चेत आहे. दोघे देखील त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणार टायगर त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.

सांगायचं झालं तर, टायगर कधीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत नाही. पण आता अभिनेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत टायगर याने दिशाच्या नावाचा उल्लेख केला आहे. मुलाखतीत टायगर याला एक प्रश्न विचारण्यात आला, ‘तू सिंगल आहेस का? तुझं आयुष्य कोणत्या दिशेला जात आहे…’

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘माझ्या आयुष्यात फक्त एकच दिशा आहे आणि ते माझं काम…’, एवढंच नाही तर, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या ट्रेलर लॉंचमध्ये अक्षय कुमार याला विचारलं की, ‘टायगरला काय सल्ला देऊ इच्छितो?’ यावर खिलाडी कुमार म्हणाला, ‘मी टायगर याला फक्त एवढंच सांगेल की एकाच दिशेवर लक्ष केंद्रीत कर…’ ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ईदच्या मुहूर्तावर 10 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सांगायचं झालं तर एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र टायगर आणि दिशा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या… दिशा – टायगर यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं आहे. ‘बेफिकरा’, ‘बाघी-2’ सिनेमांमध्ये दोघे एकत्र दिसले. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टायगर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. चाहते देखील अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.