Oppenheimer | ख्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ची भारतात तुफान क्रेझ; एका तिकिटाची किंमत पाहून व्हाल थक्क!

देशभरातील IMAX स्क्रीन्सवरील 'ओपनहायमर' या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत थक्क करणारी आहे. दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये या तिकिटांची किंमत दोन हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. पीव्हीआर सिलेक्ट सिटी वॉकमध्ये रिक्लायनर सीट्सची किंमत 2100 रुपये आहे.

Oppenheimer | ख्रिस्तोफर नोलनच्या 'ओपनहायमर'ची भारतात तुफान क्रेझ; एका तिकिटाची किंमत पाहून व्हाल थक्क!
OppenheimerImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 1:24 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : ‘ओपनहायमर’ या हॉलिवूड चित्रपटाची क्रेझ भारतापर्यंत पोहोचली आहे. ख्रिस्तोफर नोलनच्या या चित्रपटाला आताच्या काळातील सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखलं जात आहे. ओपनहायमर हा चित्रपट जागतिक स्तरावर आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत आहे. ख्रिस्तोफर नोलनचा मोठा चाहतावर्ग ज्या ज्या देशात आहे, तिथे या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाविषयी असलेल्या या क्रेझचा अंदाज त्याच्या तिकिटाच्या किंमतीवरून सहज येतो. कारण या चित्रपटाचं एक तिकिट जवळपास 2450 रुपयांना विकलं जात आहे. विशेष म्हणजे IMAX शोजची ओपनिंग वीकेंडची तिकिटं दोन दिवस आधीच विकली गेली आहेत.

1930 आणि 40 च्या दशकात अणुबॉम्ब तयार करण्याचा अमेरिकेच्या गुप्त ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’वर या चित्रपटाची कथा आधारित आहे. शास्त्रज्ञ रॉबर्ट जे ओपनहायमर यांच्या नजरेतून ही कथा सांगितली जात आहे. ते अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. या चित्रपटात सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत आहे.

येत्या शुक्रवारी म्हणजेच 21 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा बहुचर्चित आणि बहुचर्चित चित्रपट जगभरातील IMAX स्क्रीन्स व्यापून टाकणार यात काही शंका नाही. टॉम क्रूझचा ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटासाठीही ही मोठी टक्कर असणार आहे. कारण हा चित्रपट प्रदर्शित होऊनसुद्धा फक्त दहाच दिवस झाले आहेत. यामागचं कारण म्हणजे IMAX जगभरात एका वेळी फक्त एकच चित्रपट प्रदर्शित करते. भारतात IMAX स्क्रीन्सचे 125 शोज आहेत आणि Sacnilk नुसार, बुधवारी सकाळपर्यंत 85 टक्क्यांपेक्षा जास्त शोज विकले गेले आहेत. याचाच अर्थ ओपनिंग वीकेंडसाठी आयमॅक्सचे सर्व शोज विकले जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर

एका तिकिटाची किंमत 2450 रुपये

देशभरातील IMAX स्क्रीन्सवरील ‘ओपनहायमर’ या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत थक्क करणारी आहे. दिल्ली-एनसीआरच्या काही भागांमध्ये या तिकिटांची किंमत दोन हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. पीव्हीआर सिलेक्ट सिटी वॉकमध्ये रिक्लायनर सीट्सची किंमत 2100 रुपये आहे. पहिल्या दिवसाचे हे सर्व सीट्स आधीच विकले गेले आहेत. मुंबईत तिकिटांची किंमत आणखी जास्त आहे. पीव्हीआर पॅलेडियम मॉलमध्ये IMAX शोसाठी रिक्लायनर सीट्सची किंमत 2450 रुपये आहे. पहिल्या दिवसाची ही तिकिटंसुद्धा पूर्णपणे विकली गेली आहेत.

‘ओपनहायमर’ चित्रपटातील कलाकार

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित या चित्रपटात सिलियन मर्फी मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबतच एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, फ्लॉरेन्स पग, जोश हार्टनेस, केसी अफ्लेक, रामी मालेक आणि केनेथ ब्रनाघ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 21 जुलै रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....