मैं सस्ता दिखता है क्या?, ऑरी याची मिनिटांची कमाई लाखोंमध्ये, इनकम सोर्स जाणून भारतीच्या भुवया उंचावल्या

Orry Income | कोणतंच काम हाती नसताना कोट्यवधी कसे कमावतो ऑरी? मिनिटांची कमाई लाखोंमध्ये... गडगंज श्रीमंत आहे ऑरी, त्याची कमाई जाणून भारती सिंग हिच्या भुवया उंचावल्या... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऑरी याच्या कमाईची चर्चा..

मैं सस्ता दिखता है क्या?, ऑरी याची मिनिटांची कमाई लाखोंमध्ये, इनकम सोर्स जाणून भारतीच्या भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: May 11, 2024 | 8:54 AM

ओरहान अवात्रामणी उर्फ ऑरी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्यांपैकी एक आहे. कोणत्याही सेलिब्रिटीने पार्टी किंवा इतर कोणत्या गोष्टीचं आयोजन केसं असेल तर ऑरी त्याठिकाणी असतोच… शिवाय सेलिब्रिटींसोबत स्वतःच्या सिग्नेचर पोजमध्ये काढत असलेल्या फोटोंमुळे देखील ऑरी कायम चर्चेत असतो. ऑरी फक्त सेलिब्रिटींच्या पार्टीमध्येच नाही तर, अंबानी यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील उपस्थित असतो. फक्त सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये उपस्थित राहून नाही इतर मार्गांनी देखील ऑरी लाखोंची कमाई करतो.

आतापर्यंत ऑरी याने अनेकदा त्याच्या कामांबद्दल सांगितलं आहे. पण तरी देखील ऑली याला कायम त्याच्या कमाई बद्दल विचारलं जातं. नुकताच भारती सिंग हिने देखील पॉडकास्टमध्ये ऑरी याला त्याच्या कमाईबद्दल विचारलं. तेव्हा ऑरीने स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

भारती ऑरी याला विचारते, ‘महागडा आहेस तू…’ यावर ऑरी म्हणतो, ‘मैं सस्ता दिखता है क्या?’ पुढे हर्ष ऑरी याला विचारतो एका फोटोसाठी किती रुपये घेतोस. ऑरी याने सांगितलेला आकडा थक्क करणारा आहे. ऑरी एका फोटोसाठी 20 लाख रुपये घेतो. सध्या सर्वत्र ऑरी याची चर्चा रंगली आहे.

पुढे ऑरी म्हणतो, ‘जर कोणी चाहता माझ्याकडे सेल्फीसाठी आला तर, मी त्यांच्याकडून पैसे घेत नाही. पण कोणी माझ्याकडे फोटो काढण्याची मागणी करत असेल तर मी 20 लाख रुपये घेतो. शिवाय कोणत्या शोमध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमात जाण्यासाठी मी 25 लाख रुपये चार्ज करतो. असं देखील ऑरी म्हणाला.

‘बिग बॉस 17’ मध्ये देखील ऑरी याने केला होता मोठा खुलासा…

याआधी ऑरी याने अभिनेता सलमान खान याला ‘बिग बॉस 17’ मध्ये स्वतःच्या कमाईबद्दल सांगितलं होतं. ऑरी याला पर्टीमध्ये जाण्याचे नाही तर, फोटो काढण्याचे पैसे मिळतात. पार्टीमध्ये काढलेल्या फोटोचं ऑरी याला 25 ते 30 लाख रुपये मिळतात. ऑरी म्हणाला होता, ‘मला पार्टीमध्ये जाण्याचे पैसे मिळत नाहीत. लोकं मला बोलतात की आमच्या लग्नात ये. माझ्यासोबत अशी पोज दे.. माझ्या पत्नीसोबत अशी पोज दे.. मुलांसोबत फोटो पोस्ट कर… ज्यासाठी मला 25 ते 30 लाख रुपये मिळतात.’

सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत.. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड झालंय. सुरुवातीला फक्त जान्हवी कपूर, निसा देवगण, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्ससोबत दिसणारा ऑरी काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्येही दिसला. ऑरी हा बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे. स्टारकिड देखील ऑरीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.