Oscar 2024 : भावाला लिप किस ते स्टेजवर लगावलेली कानशिलात, वादाच्या भोवऱ्यातील ‘ऑस्कर’
Oscar 2024 : 96 वा अकादमी ऑक्सर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे... जगभरातील मानाचा समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या यादीत 'ऑस्कर' पुरस्कार अव्वल स्थानी आहे... पण याआधी अनेकदा पुरस्कार सोहळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे...
Oscar 2024 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऑक्सर पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. दरम्यात पुरस्करांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण याआधी अनेकदा ऑस्कर पुरस्कार सोहळा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आज देखील जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळाची चर्चा रंगते तेव्हा मागे झालेले वाद समोर येतात… तर आज जाणुन घेऊ ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेले वाद…
मार्लन ब्रँडो यांनी पुरस्कार स्वीकारण्यास दिला होता नकार…
1973 मध्ये मार्लन ब्रँडो यांना ‘द गॉडफादर’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. पण अभिनेत्याने पुरस्कार स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यांच्या जागी पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमेरिकन कार्यकर्ते सेचिन लिटलफेदर पोहोचले होते. यादरम्यान सेचिनने सांगितले होते की, हॉलिवूडमध्ये मूळ अमेरिकन लोकांची प्रतिमा दाखवण्यात आल्याने तो नाराज असल्याने त्याने हा पुरस्कार नाकारला होता.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अँजेलिना
2000 च्या ऑस्कर पुरस्कारादरम्यान एका लिप किसने वाद निर्माण झाला होता. पुरस्कार सोहळ्यात अँजेलिना जोलीला गर्ल इंटरप्टेड या सिनेमाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अवॉर्ड फंक्शनपूर्वी अँजेलिनाने रेड कार्पेटवर भावाला लिप किस दिला, ज्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता.
‘ला ला लँड’च्या चुकून ऑस्करच्या घोषणेवरून निर्माण झालेला वाद
2017 मध्ये ऑस्कार पुरस्कार सोहळ्या दरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. पुरस्कार सोहळ्या दरम्यान ‘ला ला लँड’ सिनेमाची घोषणा सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून करण्यात आली होती. पण नंतर चूक सुधारण्यासाठी प्रेजेंटर्सच्या हातात चुकीचा एनवलप दिल्याची घोषणा करण्यात आली… त्यानंतर ‘मूनलाईट’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
मंचावर लगावली कानशिलात, अभिनेत्रीने झालेली नग्न…
अभिनेता विल स्मिथने 2022 च्या ऑस्कर पुरस्कारादरम्यान होस्ट ख्रिस रॉक याच्या कानशिलात मारली होती. होस्ट क्रिसने पत्नीवर केलेल्या विनोदाचा स्मिथला राग आल्यामुळे कानशिलात लगावल्याची माहिती समोर आली. तर 2021 मध्ये, हॉलिवूडची फ्रेंच अभिनेत्री कोरिन मासेरोने स्टेजवर तिचे कपडे काढून सर्वांना आश्चर्यचकित केलं. अभिनेत्रीने फ्रान्स सरकारच्या निषेधार्थ आपले कपडे काढले होते. अभिनेत्रीच्या अंगावर घोषवाक्य लिहिलं होते.