मुंबई – हॉलिवूडकरांना (hollywood) प्रचंड दु:ख देणारी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे अनेकजण दु:खात असल्याचं सोशल मीडियावरून (social media) समजतंय. हॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री रेजिना किंग (Regina King) यांच्या मुलाने वयाच्या 26 वर्षी नुकतीच आत्महत्या केल्याची समजतंय. या वृत्ताला स्वत:रेजिना किंग दुजोरा दिला आहे. त्यांच्या मुलाचं नाव इयान एलेक्जेंडर असं होतं. इयान एलेक्जेंडर (Ian Alexander Jr.) याच्या आत्महत्येमुळं किंग यांचं संपुर्ण घर हादरून गेलं आहे. इयान एलेक्जेंडर आत्महत्या करण्याचं पाऊल का उचललं असावं याबाबत अद्याप काहीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. अचानक झालेल्या त्याच्या मृत्यूने संपुर्ण हॉलीवूड हळहळ व्यक्त करत आहे. तसेच रेजिना किंग यांच्या दु:खात आम्हीही समील असल्याचे म्हणटले आहे. रेजिना किंग यांच्या देशातल्या सर्व चाहत्यांनी आम्ही सर्व तुमच्या दुखात असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
रेजिना किंग यांनी दिली माहिती
रेजिना किंग यांनी इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी इयान एलेक्जेंडर सोबतचा एक फोटो शेअर करून मृत्यूची माहिती दिली आहे. तो एका लखलखत्या ता-याप्रमाणे होता. तसेच त्याने प्रत्येकवेळी इतरांच्या आनंदाची काळजी घेतली आहे. त्याच्या वाईट काळात त्याने एकटे राहण्याची तो कुटुंबियांशी बोलला होता. पण इंन्स्टाग्रामवरच्या पोस्टवरून लोकांनी तो मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केली असावी असं असा तर्क लावला आहे.
हॉलिवूडकरांना शॉक
रेजिना किंग यांचा एकुलता एक मुलगा इयान इयान एलेक्जेंडरचा बुधवारी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. 26 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रेजिना किंग या हॉलिवूडकरच्या प्रसिध्द अभेनित्री आणि डायरेक्टर राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हॉलिवूडचा सगळा गोतावळा पुर्णपणे हादरून गेला आहे. रेजिना किंग यांना मानाचा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला आहे. जेनेच जॅन्कशन म्हणतात, की इयानच्या आत्महत्या झाल्याचं ऐकून मी पुर्णपणे हादरून गेलो आहे. संपुर्ण जगातील रेजिना किंग यांच्या चाहत्यांनी आम्ही तुमच्या दु:खात सामील असल्याचे म्हणटले आहे.