Oscars 2022: विल स्मिथ ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता; ‘किंग रिचर्ड’साठी मिळाला ऑस्कर
जगभरात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा कोरोना महामारीमुळे तब्बल तीन वर्षांनंतर आयोजित केला आहे. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतोय. या वर्षी तमिळ चित्रपट 'कूजांगल'ला भारताने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी नामांकन दिलं आहे. या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन यंदा रेजिना हॉल, एमी शुमर, वांडा स्कायज करत आहेत.
जगभरात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर (Oscars 2022) पुरस्कार सोहळा कोरोना महामारीमुळे तब्बल तीन वर्षांनंतर आयोजित केला आहे. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतोय. भारतीय वेळेनुसार सोमवारी (28 मार्च) पहाटे 5,30 वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. कोविडमुळे दोन वेळा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. अखेर 94वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडतोय. या वर्षी तमिळ चित्रपट ‘कूजांगल’ला भारताने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी नामांकन दिलं आहे. या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन यंदा रेजिना हॉल, एमी शुमर, वांडा स्कायज करत आहेत. 94 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत मदर इंडिया, सलाम बॉम्बे, श्वास (मराठी) आणि लगान या चार भारतीय चित्रपटांना स्थान मिळालं आहे. पहिला ऑस्कर पुरस्कार 1929 मध्ये आयोजित करण्यात आला होता, तर 1957 पासून भारतातील चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जात आहेत. (Academy Award)
LIVE NEWS & UPDATES
-
या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर Greig Fraser Dune यांना मिळाला.
या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार Greig Fraser Dune यांना मिळाला.
At 5:37 PT, the Oscar for this year’s Best Cinematography went to Greig Fraser Dune. #Oscars#Perpetual Oscar moments sponsored by @Rolex. Rolex and cinema – more than just a vision: https://t.co/S21rw4cNQA pic.twitter.com/01WRfUFkli
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
‘Belfast’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा ऑस्कर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा श्रेणीत ऑस्कर कोणाला मिळाला
केनेथ ब्रानाघ यांना बेलफास्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. Sian Hederला सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा CODA साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
-
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन (Jessica Chastain)
‘द आईज ऑफ टॅमी फाये’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री जेसिका चेस्टेनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Best Actress in a Leading Role goes to… #Oscars pic.twitter.com/Yny0Mxj9Yr
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विल स्मिथ (Will Smith)
किंग रिचर्ड या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Best Actor in a Leading Role goes to… #Oscars pic.twitter.com/yEH5RLzxh2
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- बिली एलिश आणि फिनियास ओकॉनेल
‘नो टाइम टू डाय’ या चित्रपटातील ‘नो टाइम टू डाय’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Best Original Song goes to… #Oscars pic.twitter.com/GviJzb3XZo
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- जेन कॅम्पियन (Jane Campion)
‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटासाठी जेन कॅम्पियनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच ऑस्कर आहे. याआधी 1994 मध्ये ‘द पियानो’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर मिळाला होता. याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्यांना त्यावेळी नामांकनसुद्धा मिळालं होतं.
The Oscar for Best Directing goes to… #Oscars pic.twitter.com/sDJjv6DYOf
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
भारताच्या ‘Writing With Fire’ला ऑस्कर नाहीच
सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या शर्यतीत भारताच्या ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटाचा पराभव झाला. ‘समर ऑफ सोल’ने हा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (अभिनेत्री)- ॲरिएना डीबोस (Ariana DeBose)
‘वेस्ट साइड स्टोरी’मधील दमदार कामगिरीसाठी ॲरिएना डीबोसला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Actress in a Supporting Role goes to Ariana DeBose for her exceptional performance in ‘West Side Story.’ #Oscars @ArianaDeBose pic.twitter.com/ZydSL3LD3m
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
बेस्ट फिल्म एडिटिंग- ड्युन (Dune)
जो वॉकर यांच्या ‘ड्युन’ या चित्रपटाने बेस्ट फिल्म एडिटिंगचा पुरस्कार पटकावला आहे.
The Oscar for Best Film Editing goes to… #Oscars pic.twitter.com/FE5XZdd3rV
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- जेनी बीवन (Jenny Beavan)
‘क्रुएला’ या चित्रपटातील दमदार कामगिरीसाठी जेनी बीवनला सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइनचा पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Costume Design goes to Jenny Beavan for her stunning work on ‘Cruella.’ Congratulations! #Oscars pic.twitter.com/L0QcDpFc3l
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार (अभिनेता)- ट्रॉय कोत्सुर
‘CODA’ मधील दमदार अभिनयासाठी ट्रॉय कोत्सुर सहाय्यक भूमिकेतील अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Actor in a Supporting Role goes to Troy Kotsur for his spectacular performance in ‘CODA.’ Congratulations! #Oscars @troykotsur pic.twitter.com/pX3tZGzt2X
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म- ड्राइव्ह माय कार (Drive My Car)
जपानच्या ‘ड्राइव्ह माय कार’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. रुसुके हमागुची यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
The Oscar for Best International Feature Film goes to… #Oscars pic.twitter.com/obGccrLuIA
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट माहितीपट (फिचर)- समर ऑफ सोल (Summer Of Soul)
समर ऑफ सोल (.. ऑर, व्हेन द रिव्हॉल्युशन कुड नॉट बी टेलिव्हाइज्ड) या 2021 च्या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचरचा पुरस्कार मिळाल आहे.
The Oscar for Best Documentary Feature goes to… #Oscars pic.twitter.com/1BkuPDGHye
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर- एन्कँटो (Encanto)
जॅरेड बुश, बायरन हॉवर्ड, वेट मेरिनो आणि क्लार्क स्पेन्सर यांच्या ‘एन्कँटो’ला बेस्ट अॅनिमेटेड फिचरचा पुरस्कार मिळाला आहे.
The Oscar for Best Animated Feature goes to… #Oscars pic.twitter.com/8k8sJTtT37
— The Academy (@TheAcademy) March 28, 2022
-
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले : बेलफास्ट (Belfast)
केनेथ ब्रानाघ (Kenneth Branagh) यांनी ‘बेलफास्ट’साठी सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.
Kenneth Branagh wins the best original screenplay Oscar for writing “Belfast.”
“This is an enormous tribute to my family,” Branagh said. https://t.co/BygP2ls3id pic.twitter.com/jeLDwGrLuj
— The Associated Press (@AP) March 28, 2022
Published On - Mar 28,2022 7:47 AM