Oscars 2024 live streaming : कुठे आणि कधी पाहू शकता ऑस्कर अवॉर्ड सेरेमनी? जाणून घ्या
भारतात कधी आणि कुठे पाहू शकतात ऑस्कर पुरस्कार सोहळा... सध्या सर्वत्र पुरस्कार सोहळ्याची चर्चा... म्हणजेच 10 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये पुरस्कार सोहळा रंगणार आहे... तर भारतात कधी पाहाता येणार पुरस्कार सोहळा...
Oscars 2024 live streaming : ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars 2024) रविवारी म्हणजेच 10 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची चर्चा सुरु आहे. फक्त देशात नाहीतर, जगभरातील लोकांचं लक्ष आता पुरस्कार सोहळ्याकडे लागलं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट करण्याची जबाबदारी कॉमेजियन जिम्मी किमेल हिच्यावर आहे. जर तुम्हाला भारतात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर, तुम्ही जाणून घ्या भारतीयांना कुठे आणि कधी ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहाता येणार आहे.
भारतातील नागरिक ऑस्कर पुरस्कार सोहळा 2024 सोमावार म्हणजे 11 मार्च रोजी पहाटे 4.00 वाजता लाईव्ह पाहू शकता. पुरस्कार सोहळा एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त एंजेलिसमधील ओव्हेशन हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पाडणार आहे.
कधी आणि कुठे पाहून शकता ऑस्कर 2024
भारतीय नागरिक भारतात लाईव्ह ऑस्कर पुरस्कार सोहळा पाहू शकतात. भारतीय प्रेक्षक डिज्नी + हॉटस्टारवर पुरस्कार सोहळा पाहू शकतात. आता कोणत्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला दिग्दर्शकाला आणि इतर वेगळ्या श्रेणींमध्ये कोणत्या कालाकारांनी ऑस्कर पुरस्कारने सन्मानित करण्यात येतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (96th Academy Awards) कलाविश्वात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं महत्त्वा फार मोठं आहे. कालाकारांनी केलेल्या कामाची पोचपावती आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. आता देखील सर्वांचं लक्ष ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलं आहे.