Oscars Awards 2023 Live Updates | ऑस्करमध्ये ‘या’ चित्रपटाने पटकावले सर्वाधिक पुरस्कार
Oscars Awards 2023 Live 95th Academy Awards Updates | आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. त्यानंतर आता 95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत.
Oscars Awards 2023 Live Updates | ऑस्कर 2023 साठी संपूर्ण जगभरातील सेलिब्रिटींचा मेळावा लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये भरला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे असंख्य भारतीयांचंही लक्ष आहे. 95 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभाागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. एस. एस. राजामौली यांच्या RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळालं आहे. या विभागात एकूण पाच गाणी आहेत, त्यापैकीच एक नाटू नाटू हे गाणं आहे. RRR शिवाय भारताकडून पाठवलेल्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला (All That Breathes) बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म विभागात आणि ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ला (The Elephant Whisperers) बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात नामांकन मिळालं आहे. त्यामुळे भारताकडून एकूण तीन चित्रपटांना नामांकनं मिळाली आहेत.
ऑस्कर 2023 चं लाइव्ह टेलिकास्ट भारतात 13 मार्च रोजी सकाळी 5.30 पासून होणार आहे. ऑस्करचं लाइव्ह टेलिकास्ट डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. त्याचप्रमाणे एबीसी नेटवर्क विविध स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचं प्रसारण करणार आहे. यामध्ये युट्यूब, हुलू लाइव्ह टीव्ही, डायरेक्ट टीव्ही, FUBO टीव्ही, AT&T टीव्ही यांचा समावेश आहे.
यंदाचा ऑस्कर आणखी एका कारणासाठी खास आहे. कारण अभिनेत्री दीपिका पदुकोण अवॉर्ड प्रेझेंट करणार आहे. अवॉर्ड प्रेझेंटर म्हणून निवड होणारी दीपिका ही तिसरी भारतीय अभिनेत्री आहे. याआधी 2016 मध्ये प्रियांका चोप्राने आणि तिच्या आधी 1980 मध्ये पर्सिस खंबाटाने ऑस्करमध्ये अवॉर्ड प्रेझेंट केलं होतं.
LIVE NEWS & UPDATES
-
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला, करण जोहर याने थेट आनंदात उड्या मारल्या
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्याच्या आनंदात बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टास्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, त्याने आनंदाने बेडवर उड्या मारल्या…
-
Oscars 2023 : ‘लाज वाटली पाहिजे…’, होस्ट RRR बद्दल असं काय म्हणाला ज्यामुळे सर्वत्र खळबळ?
‘लाज वाटली पाहिजे…’, RRR सिनेमाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर होस्ट असं काय म्हणला? ज्यामुळे नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप… वाचा सविस्तर
-
-
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतरच्या पार्टीतील दीपिकाचा ग्लॅमरस लूक
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर पार पडलेल्या पार्टीत दीपिकाच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
View this post on Instagram -
ऑस्कर पुरस्कारादरम्यान ‘त्या’ क्षणी दीपिका पदुकोण झाली भावूक
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दीपिका पदुकोण झाली भावूक, वाचा सविस्तर
-
Oscars 2023 : कोण आहेत ‘त्या’ दोन महिला, ज्यांनी भारताला मिळवून दिला पहिला ऑस्कर पुरस्कार?
Oscars 2023 : भारतातील ‘या’ दोन महिलांनी रचला नवा इतिहास
जाणून घेऊया अशा दोन महिलांबद्दल ज्यांनी परदेशात भारताच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा… वाचा सविस्तर
-
-
प्रभूदेवाने ‘नाटू नाटू’ गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित यांचं केलं अभिनंदन
‘तू करून दाखवलंस, आम्हाला तुझा अभिमान आहे’, अशा शब्दांत केलं कौतुक
-
आशियाई कलाकारांनी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रचला इतिहास
आशियाई कलाकारांनी दोन ऑस्कर पुरस्कार जिंकले
मिशेल येओला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर की हुई क्वानला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार
आशियाई स्टार्सनी एकाच वर्षात दोन ऑस्कर पुरस्कार जिंकण्याची ही पहिलीच वेळ
-
Oscars 2023: भारताने कोरलं दोन ऑस्कर पुरस्कारांवर नाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आरआरआर’ (RRR) आणि ‘द एलीफेंट विस्पर्स’ (The Elephant Whisperers) सिनेमाच्या टिमला दिल्या शुभेच्छा
Exceptional!
The popularity of ‘Naatu Naatu’ is global. It will be a song that will be remembered for years to come. Congratulations to @mmkeeravaani, @boselyricist and the entire team for this prestigious honour.
India is elated and proud. #Oscars https://t.co/cANG5wHROt
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023
-
मेगास्टार चिरंजीवी यांच्याकडून RRR टीमचं कौतुक
“ऑस्कर हे अजूनही भारतासाठी एक स्वप्नच राहिलं असतं. पण एका व्यक्तीच्या धैर्याने आणि विश्वासाने ते पूर्ण होऊ शकलं,” अशा शब्दांत त्यांनी RRR चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचं कौतुक केलं.
-
‘नाटू नाटू’ गाण्यावरील परफॉर्मन्सला ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स
परफॉर्मन्सनंतर उपस्थितांकडून मिळालं स्टँडिंग ओव्हेशन
Standing ovation for #NaatuNaatu Performance at the #Oscars95 ❤️?❤️?❤️????????? #RRRMovie pic.twitter.com/kDwMNfnLM8
— RRR Movie (@RRRMovie) March 13, 2023
-
‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार
बेस्ट पिक्चर (सर्वोत्कृष्ट चित्रपट)- एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला मिळाली 11 नामांकनं
11 नामांकनांपैकी या चित्रपटाने पटकावले 7 ऑस्कर पुरस्कार
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फॅबलमॅन्स, टार, वीमेन टॉकिंग, ट्रँगल ऑफ सॅडनेस
-
मिशेल येओने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार
एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी मिशेल विलियम्सला मिळाला पुरस्कार
नामांकन- केट ब्लँचेट (टार), ॲना डे आर्म्स (ब्लॉन्ड), अँड्रिया राइजबोरो (टू लेजली), मिशेल विलियम्स (द फेबलमेन्स), मिशेल येओ (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
-
‘द ह्वेल’ या चित्रपटासाठी ब्रँडन फ्रेजरने जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
नामांकन- ऑस्टिन बटलर (एल्विस), कॉलिन फेरेल (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रँडन फ्रेजर (द ह्वेल), पॉल मॅसकल (आफ्टरसन), बिल नाय (लिविंग)
-
बेस्ट डायरेक्शन (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन)- शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
नामांकन- मार्टिन मॅकडोना (द बँशीज ऑफ इनिशेरिन), डॅनियल क्वान आणि डॅनियल, शायनर्ट (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टीवन स्पीलबर्ग (द फॅबलमॅन्स), टॉड फील्ड (टार), रबेन ओस्टलँड (ट्रँगल ऑफ सॅडनेस)
-
बेस्ट फिल्म एडिटिंग- एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स
नामांकन- द बँशीज ऑफ इनिशेरिन, एल्विस, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, टार, टॉप गन: मॅवरिक
-
RRR च्या ‘नाटू नाटू’ने जिंकला ऑस्कर पुरस्कार
एस. एस. राजामौली यांच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने पटकावला बेस्ट ओरिजनल स्कोअरचा पुरस्कार
नामांकनं- ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’, ‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’
‘Naatu Naatu’ from ‘RRR’ wins the Oscar for Best Original Song! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/tLDCh6zwmn
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
‘टॉप गन: मॅवरिक’ या चित्रपटाने पटकावला बेस्ट साऊंडचा ऑस्कर पुरस्कार
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, एल्विस, टॉप गन: मॅवरिक
-
बेस्ट ॲडाप्टेड स्क्रीनप्ले- वीमेन टॉकिंग
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ग्लास अन्यन: अ नाइव्स आउट मिस्ट्री, लिविंग, टॉप गन: मॅवरिक, वीमेन टॉकिंग
-
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस
नामांकन- द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वंस, द फेबलमेन्स, टार, ट्रँगल ऑफ सॅडनेस
-
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने जिंकला बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा ऑस्कर पुरस्कार
जो लेटेरी, रिचर्ड बॅनेहम, एरिक सेंडॉन आणि डॅनिअल बॅरेट यांनी पटकावला ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’साठी पुरस्कार
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, द बॅटमॅन, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, टॉप गन: मॅवरिक
‘Avatar: The Way of Water’ wins Best Visual Effects #Oscars #Oscars95 pic.twitter.com/U7xJ0D20tO
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ने जिंकला बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, बेबीलॉन, द बँशीज ऑफ इनिशेरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स, द फेबलमेन्स
-
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार: द वे ऑफ वॉटर, बाबीलॉन, एल्विस, द फेबलमेन्स
-
‘द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स’ने पटकावला बेस्ट ॲनिमेटिड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार
नामांकन- द बॉय, द मोल, द फॉक्स अँड द हॉर्स, द फ्लाइंग सेलर, आइस मर्चेंट्स, माय इअर ऑफ डिक्स, ॲन ऑस्ट्रिच टोल्ड मी द वर्ल्ड इज फेक अँड आय थींक आय बिलिव इट
-
बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्म विभागात भारताने पटकावला ऑस्कर पुरस्कार
द एलिफेंट व्हिस्परर्स या शॉर्ट फिल्मने जिंकला ऑस्कर पुरस्कार
नामांकन- द एलिफेंट व्हिस्परर्स, हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट
‘The Elephant Whisperers’ wins the Oscar for Best Documentary Short Film. Congratulations! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/WeiVWd3yM6
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
‘ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ चित्रपटाने जिंकला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अर्जेंटीना, 1985, क्लोज, ईयो, द क्वाइट गर्ल
-
ऑस्करच्या मंचावर RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्यावर धमाल Live परफॉर्मन्स
गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांनी सादर केलं ‘नाटू नाटू’ गाणं
या गाण्यावर ऑस्करच्या मंचावर जबरदस्त परफॉर्मन्स
-
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- रूथ कार्टर (ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेवर)
नामांकन- रूथ कार्टर (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर), मेरी जोफ्रेस (बेबीलॉन), कॅथरीन मार्टिन (एल्विस), जेनी बीवन (मिस हेरिस गोज टू पेरिस)
-
‘द ह्वेल’ या चित्रपटाने जिंकला सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंगचा ऑस्कर पुरस्कार
ॲड्रिएन मोरॉट, जुडी चिन आणि ॲनिमेरी ब्रॅडली यांनी ‘द ह्वेल’ चित्रपटासाठी पटकावला सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंगचा ऑस्कर पुरस्कार
नामांकन- द बॅटमॅन, ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर, एल्विस, द ह्वेल
-
ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट या चित्रपटासाठी जेम्स फ्रेंडने जिंकला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट (जेम्स फ्रेंड)
नामांकन- ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट, एल्विस, टार, अम्पायर ऑफ लाइट, बार्डे, फॉल्स क्रॉनिकल ऑफ ए हँडफुल ऑफ थ्रथ्स
-
‘ॲन आयरिश गुडबाय’ने पटकावला सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार
ॲन आयरिश गुडबाय, लवालू, ले प्युपिल्स, नाइट राइड, द रेड सुटकेस या लघुपटांना मिळालं होतं नामांकन
‘An Irish Goodbye’ is taking home the Oscar for Best Live Action Short Film! #Oscars95 pic.twitter.com/hXZrfyCbq4
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म- नवाल्नी
नवाल्नीने जिंकला बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार
भारताच्या ‘ऑल दॅट ब्रीद्स’लाही मिळालं होतं नामांकन
नामांकन- ऑल दॅट ब्रीद्स, ऑल द ब्युटी अँड द ब्लडशेड, फायर ऑफ लव्ह, अ हाऊस मेड ऑफ स्प्लिंटर्स, नवाल्नी
-
जेमी ली कर्टिसने जिंकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार
एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स या चित्रपटातील भूमिकेसाठी जेमी ली कर्टिसने जिंकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार
नामांकन- अँजेला बेसेट (ब्लॅक पँथर: वकांडा फॉरेवर ), हॉन्ग चाउ (द ह्वेल), कॅरी कोंडोन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), जेमी ली कर्टिस (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स), स्टेफनी शू (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
You never forget your first. Congratulations to @jamieleecurtis for winning the Oscar for Best Supporting Actress! #Oscars95 pic.twitter.com/hHdUTNhTQW
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार- कि ह्यू क्वान (एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स)
एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स या चित्रपटातील कि ह्यू क्वानने जिंकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार
ऑस्कर स्वीकारल्यानंतर अभिनेता मंचावर भावूक
ब्रँडन ग्लीसन (द बँशीज ऑफ इनिशेरिन), ब्रायन टायरी हेनरी (कॉजवे), जड हर्श (द फॅबलमॅन्स), बॅरी कियोगन (द बँशीज ऑफ इनिशेरिन) या चार कलाकारांना दिली मात
Congratulations to Ke Huy Quan on winning Best Supporting Actor! @allatoncemovie #Oscars95 pic.twitter.com/VEI3I0bZDh
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
ऑस्करचा पहिला पुरस्कार जाहीर
गुइलेर्मो डेल टोरो यांच्या ‘पिनोकियो’ चित्रपटाने जिंकला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटाचा पुरस्कार
मार्सेल द शेल विद शूज ऑन, पुस इन बूट्स: द लास्ट विश, द सी बीस्ट, टर्निंग रेड या चित्रपटांना दिली मात
The first Oscar of the night goes to @pinocchiomovie for Best Animated Feature #Oscars95 pic.twitter.com/KxO3OSiWlH
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
-
ऑस्करच्या स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करणार ‘नाटू नाटू’ गाणं
‘नाटू नाटू’ या गाण्याचे गायक राहुल सिपलीगुंज आणि काल भैरव यांचा रेड कार्पेट लूक
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हे दोघं ‘नाटू नाटू’ गाणं लाइव्ह करणार सादर
Our singers @kaalabhairava7 & @Rahulsipligunj have arrived to the #Oscars95 event!! #Oscars #NaatuNaatu #RRRMovie @TheAcademy pic.twitter.com/aNr3eWVWuz
— RRR Movie (@RRRMovie) March 12, 2023
-
ऑस्कर पुरस्कार प्रेझेंट करण्यासाठी दीपिका पदुकोण सज्ज
अभिनेत्री दीपिका पदुकोणची ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून निवड
या पुरस्कार सोहळ्यातील दीपिकाचा खास लूक
View this post on Instagram -
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात RRR ची टीम
दिग्दर्शक एस. एस. राजामौली, अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि रामचरण हे त्रिकूट ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज
The RRR at the #OSCARS!!! #Oscars95 #NaatuNaatu #RRRMovie pic.twitter.com/QT1LGcRFtU
— RRR Movie (@RRRMovie) March 12, 2023
-
‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्सर लॉरेन गॉटलीब करणार परफॉर्म
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अमेरिकन डान्सर आणि अभिनेत्री लॉरेन गॉटलीब RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्म करणार आहे.
-
पहा अकॅडमी अवॉर्ड्सच्या नॉमिनेशनची संपूर्ण यादी
95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या विभागात नामांकन मिळालं आहे. याशिवाय इतर दोन भारतीय चित्रपटांनाही विविध भागात नामांकनं मिळाली आहेत, वाचा सविस्तर..
Published On - Mar 13,2023 2:30 AM