200 Halla Ho : ‘पालेकरांसोबत काम करणं अद्भुत अनुभव’ अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भावना

उपेंद्र लिमये या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत, त्यांनी दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. (200 Halla Ho : 'Working with Palekar is a wonderful experience' Feelings of actor Upendra Limaye)

200 Halla Ho : 'पालेकरांसोबत काम करणं अद्भुत अनुभव' अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भावना
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 3:36 PM

मुंबई : ZEE5 चा आगामी चित्रपट ‘200- हल्ला हो’ (200 Halla Ho) चा ट्रेलर रीलीज झाल्यापासून, चाहते विविध कारणांसाठी चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर एक दशकानंतर परतले आहेत आणि सत्य कथेने प्रेरित अशी ही एक प्रभावी कथा आहे.

सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित, 200 – हलला हो!, 200 दलित महिलांनी खुल्या न्यायालयात गुंड, दरोडेखोर आणि बलात्काऱ्याला मारहाण करून कायदा आणि न्याय कसा मिळवला याची कथा आहे.

उपेंद्र लिमये यांनी व्यक्त केल्या भावना

उपेंद्र लिमये, (Actor Upendra Limaye) या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत, त्यांनी दिग्गज अभिनेते अमोल पालेकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. ते म्हणतात, “माझ्या पिढीमध्ये दोन सुपरस्टार असायचे, एक श्री अमिताभ बच्चन आणि दुसरे अमोल पालेकर. सामान्य मध्यमवर्गीय पुणेरी कुटुंबातील असल्याने मी श्री पालेकरांचा चाहता होतो आणि आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला इतक्या मोठ्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अमोल पालेकर यांनी मला अनेक वेळा दिग्दर्शित केलं आहे परंतु ‘200-हल्ला हो’ मध्ये मला त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली जे माझ्यासाठी एक स्वप्नच आहे. जे माझ्यासाठी खरे ठरले. पालेकर व्यतिरिक्त, अनेक प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता. यामध्ये सुषमा देशपांडे, गौतम जोगळेकर, रिंकू राजगुरू सारख्या मराठी चित्रपट जगतातील अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे – एकूणच तो एक अद्भुत अनुभव होता प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे. ”

‘200- हल्ला हो’ मध्ये अमोल पालेकर, वरुण सोबती, रिंकू राजगुरू, साहिल खट्टर, सलोनी बत्रा, इंद्रनील सेनगुप्ता आणि उपेंद्र लिमये सारखे उत्तम कलाकार आहेत.

योडली फिल्म्स निर्मित, सारेगामा चित्रपट निर्मिती शाखा, सार्थक दासगुप्ता लिखित आणि दिग्दर्शित, ‘200- हल्ला हो’ या चित्रपटाचा ZEE5 वर 20 ऑगस्ट रोजी प्रीमियर होईल.

संबंधित बातम्या

‘हॉलिडे’ ते ‘बेल बॉटम’, देशभक्तीच्या रंगात रंगलेयत अक्षय कुमारचे ‘हे’ खास चित्रपट!

Ratris Khel Chale 3 | अण्णा नाईक लेकालाच बनवू पाहतायत नवं ‘झाड’, त्यांच्या तावडीतून वाचू शकेल का अभिराम?

Devmanus Success Party : ‘देवमाणूस’ मालिकेच्या सक्सेस पार्टीत कलाकारांची धमाल, पाहा खास क्षण

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.