Baap Beep Baap : वडील आणि मुलामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणारं नवं गाणं, ‘बाप बीप बाप’मधील ‘वय नाही’ प्रेक्षकांच्या भेटीला

मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जात, एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे. (A new song that creates a bond of friendship between father and son, the song 'Vay Nahi' from 'Baap Beep Baap')

Baap Beep Baap : वडील आणि मुलामध्ये मैत्रीचे बंध निर्माण करणारं नवं गाणं, 'बाप बीप बाप'मधील 'वय नाही' प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 4:54 PM

मुंबई : नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘बाप बीप बाप’ (Baap Beep Baap) या वेबसीरिजची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. या वेबसीरिजमधील वडील – मुलाच्या (Father-Son Relation) नात्यातील सुंदर प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत  आहे. आता याच वेबसीरिजमधील ‘वय नाही’ हे धमाल गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे.

मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जात, एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे.

पाहा ‘वय नाही’ गाणं

शरद पोंक्षे यांनी व्यक्त केल्या भावना

‘बाप बीप बाप’मध्ये वडिलांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे संगणक हाताळताना, व्यायाम करताना, आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांमध्ये मिसळण्याचा, मुलाच्या रिलेशनशिपला स्वीकारताना दिसत आहेत. ते ज्या ज्या गोष्टी करत आहेत त्यातून दिसतेय की, वय हा केवळ एक आकडा आहे. मुलांशी समवयस्क होऊन वडिलांनी त्यांच्याशी जवळीक साधली तर हे नाते अधिक बहरू शकते, अशा पद्धतीचे हे गाणे आहे. हे गाणे प्रत्येक पालकाने ऐकावे, असे आहे. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे.

मुलाची आईसोबत जितकी जवळीक असते तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो

वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य करणारी ‘बाप बीप बाप’ वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर 31 ऑगस्टपासून आपल्या भेटीला आली आहे. वडील – मुलाचे अवघड नाते यात दिसत आहे. लॉकडाऊन आधी कधीच एकत्र वेळ न घालवलेल्या वडील-मुलाला जेव्हा लॉकडाऊनमुळे नाईलाजास्तव एकमेकांबरोबर वेळ घालवावा लागतो तेव्हा नक्की काय होते? या काळात नात्यातील संवाद गवसतो का? त्यांच्या नात्याचा हा गुंता सुटतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वरील ‘बाप बीप बाप’ पाहिल्यावर तुम्हाला मिळतील.

अमित कान्हेरे यांनी हा विषय अतिशय छान पद्धतीने हाताळला आहे. थोडेसे अबोल, संकोच असलेले हे नाते उगीचच गंभीर न करता अतिशय गोड आणि हलक्या फुलक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले आहे. या वेबसीरिजचे लेखन प्रतिक उमेश व्यास आणि अमित कान्हेरे यांनी केले असून संवाद योगेश जोशींनी लिहिले आहेत तर छायाचित्रणाची धुरा विशाल सांघवाई यांनी सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Samantha : घटस्फोटाच्या बातमी दरम्यान समंथाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, हे फोटो पाहाच

Urfi : ब्रा फ्लॉन्ट केल्यानंतर उर्फी जावेदला हिजाब परिधान करण्याचा सल्ला; म्हणाली, ‘मी फक्त मुस्लिम आहे म्हणून मला ट्रोल करताय?’

The Kapil Sharma Show : ‘थलायवी’ च्या टीमसोबत कंगना रनौतची ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये एन्ट्री, पाहा फोटो

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.