Bell Bottom : अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखवणार जलवा, या दिवशी होईल स्ट्रीमिंग

16 सप्टेंबर 2021 पासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकतात. रणजीत एम तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता, आदिल हुसेन आणि अनिरुद्ध दवे यांच्यासह कलाकारांची रोमांचक जोडी आहे. (Akshay Kumar's 'Bell Bottom' will now be shown on Amazon Prime, it will be streaming on 'this' day)

Bell Bottom : अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखवणार जलवा, या दिवशी होईल स्ट्रीमिंग
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 4:39 PM

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओनं (Amazon Prime Videos) आज जाहीर केलं आहे की ते अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर स्पाय थ्रिलर फिल्म ‘बेल बॉटम’चा (Bell Bottom) प्रीमियर विशेषतः स्ट्रिमिंग करणार आहेत. भारतातील आणि 240 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशातील लोक 16 सप्टेंबर 2021 पासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकतात. रणजीत एम तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्ता, आदिल हुसेन आणि अनिरुद्ध दवे यांच्यासह कलाकारांची रोमांचक जोडी आहे.

बेल बॉटमची निर्मिती वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यांनी त्यांच्या संबंधित बॅनर पूजा एंटरटेनमेंट आणि एम्मे एंटरटेनमेंटद्वारे केली आहे. हा अ‍ॅक्शन-पॅक्ड थ्रिलर OTT प्लॅटफॉर्मवर एक रोमांचकारी चित्रपत सादर करणार आहेत. 80 च्या दशकात घडलेल्या विमान अपहरणाच्या खऱ्या घटनांनी प्रेरित होऊन ही कथा ‘बेल बॉटम कोड’ नावाच्या अज्ञात नायकाची अतुलनीय शक्ती दर्शवते.

भारतानंतर आता हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी होणार प्रदर्शित

210 ओलिसांना अपहरणकर्त्यांपासून मुक्त करण्यासाठी एका गुप्त मोहिमेवर गुप्तहेर एजंटच्या भूमिकेत अक्षय कुमार चित्रपटात दिसला. हा चित्रपट गेल्या महिन्यात म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे एक महिन्यानंतर, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्या प्रेक्षकांसाठी स्ट्रीम केला जाईल जे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेले नाहीत. तसेच, हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी स्ट्रीम केला जाईल.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (इंडिया) चे संचालक आणि प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले, “आमच्या प्रेक्षकांना अ‍ॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट आवडतात. त्यांच्यासाठी बेल बॉटम स्ट्रीम करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटाला आमच्या प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही त्याची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत. एक मनोरंजक स्क्रिप्ट आणि सुंदर कामगिरीने सजलेला हा चित्रपट आमच्या कंटेन्ट लायब्ररीचा रत्न आहे. ”

चित्रपटाचे दिग्दर्शक रणजीत एम तिवारी म्हणतात, “माझा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे याचा मला खूप आनंद आहे. वाळवंटात हरवलेल्या खऱ्या नायकाची ही कथा आहे, जी प्रत्येकाला सांगणे मला गरजेचं वाटतं. चित्रपटात मनोरंजक कथानकांचं योग्य मिश्रण आहे. कलाकारांनी सर्व काही त्यांच्या पात्रांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहे, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.”

अ‍ॅमेझॉनवर चित्रपट रिलीज करण्यापेक्षा अधिक चांगले काय असू शकते …

ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या स्ट्रिमिंगविषयी अक्षय कुमार म्हणाला, “चित्रपटगृह उघडल्यानंतर, हा चित्रपट  जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याची वेळ आली आहे आणि अ‍ॅमेझॉनवर बेल बॉटम रिलीज करण्यापेक्षा अधिक चांगला मार्ग नाही.

पाहा ट्रेलर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.